जाहिरात

NDTV World Summit : भारताकडे दोन AI ची ताकद, पंतप्रधान मोदींनी सांगितला महत्त्वाकांक्षी भारताचा अजेंडा

PM Narendra Modi NDTV world summit : डिजिटलमधील नवशोध आणि लोकशाहीची मूल्य एकत्रितपणे राबवली जाऊ शकतात. 

NDTV World Summit : भारताकडे दोन AI ची ताकद, पंतप्रधान मोदींनी सांगितला महत्त्वाकांक्षी भारताचा अजेंडा
नवी दिल्ली:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NDTV वर्ल्ड समिटला (Prime Minister Narendra Modi at NDTV World Summit) संबोधित करताना महत्त्वाकांक्षी भारत कसा आहे याबाबत भूमिका मांडली. गेल्या दहा वर्षात सरकारने देशाच्या मजबुतीसाठी काय काय केलं याची यादीच दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, जगाचं वर्तमान आणि भविष्य AIशी जोडलं गेलं आहे. भारताकडे दोन AI पॉवर आहेत. दुसरं Aspirational India म्हणजेच महत्त्वाकांक्षी भारत. Artificial Intelligence आणि Aspirational India ची ताकद एकत्र आल्यावर विकासांची गती वाढणे स्वाभाविक आहे. आमच्यासाठी AI फक्त एक तंत्रज्ञान नाही तर भारतातील तरुणांसाठी संधीची कवाडं आहेत. याच वर्षी भारताने इंडिया AI मिशन सुरू केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत केवळ स्वताच्या फायद्यासाठी करीत नाही. आम्ही जोडलेल्या नात्याचं मूळ नेहमीच विश्वासावर आधारित राहिलं आहे. आता जगालाही हे कळू लागलं आहे. भारताने दाखवून दिलं आहे की, डिजिटलमधील नवशोध आणि लोकशाहीची मूल्य एकत्रितपणे राबवली जाऊ शकतात. भारताने दाखवून दिलं आहे की, तंत्रज्ञान हे समावेशकता, पारदर्शकता आणि सक्षमीकरणाचं माध्यम आहे. नियंत्रण आणि विभागणीचं नाही. 

NDTV World Summit : PM मोदींनी मांडलं 125 दिवसांचं प्रगतीपुस्तक, वाचा मोदी 3.0 मध्ये कसा बदलला भारत?

नक्की वाचा - NDTV World Summit : PM मोदींनी मांडलं 125 दिवसांचं प्रगतीपुस्तक, वाचा मोदी 3.0 मध्ये कसा बदलला भारत?

देशाच्या विकासाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज विकसित भारताच्या संकल्पाशी देशातील १४० कोटी जनता जोडली गेली आहे. ते स्वत: हा उपक्रम राबवत आहेत. हे केवळ जनतेच्या सहभागाचं अभियान नाही तर आत्मविश्वासाचं आंदोलन झालं आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: