
Operation Sindoor News: भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरच्या दणक्यानंतर खवळलेल्या पाकिस्तानने भारताला डिवचण्यास सुरुवात केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून पाकिस्तानकडून हल्ले सुरु आहेत. एकीकडे भारतावर गोळीबार आणि हल्ले सुरु असतानाच पाकिस्तानने नापाक कुरापत्याही सुरु केल्या असून खोट्या बातम्या पसरवत असल्याचे समोर आले आहे. देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांची पोलखोल केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणालेत विक्रम मिस्त्री?
"गेल्या 2-3 दिवसांत पाकिस्तानच्या कारवाया प्रक्षोभक होत आहेत, ज्याला भारत जबाबदारीने आणि संयमाने उत्तर देत आहे. पाकिस्तान भारतातील त्यांच्या कारवायांबद्दल चुकीचा प्रचार आणि खोट्या बातम्या पसरवत आहे, ज्याचा आम्ही निषेध करतो असे म्हणत परराष्ट्र मंत्रायलाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी संताप व्यक्त केला.
पाकिस्तानचे ते 5 दावे सपशेल खोटे..
यावेळी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या अनेक खोट्या दाव्यांचीही विक्रम मिस्त्री तसेच सोफिया कुरेशी यांनी पोलखोल केली. 'पाकिस्तानचा महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे. तसेच एस 400 हवाई संरक्षण प्रणालीचे नुकसान, सुरतगड आणि सिरसा विमानतळ, नगरोटा ब्राह्मोस तळ, चंदीगडमधील दारुगोळा नष्ट केल्याच्या बातम्या सपेशल खोट्या आहेत," असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी भारताने भारतीय हवाई दलाच्या तळांचे फोटोंही दाखवले ज्यामध्ये कोणतेही नुकसान न झाल्याचे दिसत आहे.
#WATCH | #OperationSindoor | Debunking claims of Pakistani propaganda, India shows time-stamped images of Indian air bases undamaged. pic.twitter.com/kioq065NbY
— ANI (@ANI) May 10, 2025
दरम्यान, पाकिस्तानकडून सीमेवर सैन्याची तैनाती वाढत असल्याचे दिसून येत आहे. हा परिस्थिती आणखी चिघळवण्याचा प्रयत्न आहे. भारताने आतापर्यंत पाकिस्तानच्या कृतींना पूर्ण संयमाने योग्य प्रत्युत्तर दिले आहे. भारताने सुनियोजित हल्ला केला. रडार साइट्स आणि शस्त्रास्त्र डेपो निवडले गेले आणि चिन्हांकित केले गेले. हवाई प्रक्षेपण आणि लढाऊ विमानांनी रफीकी, मुरीद, चकलाला, रहमानयार खान, शुकूर, चुनिया येथील पाकिस्तानी लष्करी तळांवर हल्ला केला, असेही यावेळी नमुद करण्यात आले.
( नक्की वाचा : IPL 2025: कधी आणि केंव्हा होणार उर्वरित सामने? वाचा सर्व अपडेट )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world