जाहिरात

Video : फिदायीन होईन, पाकिस्तानात जाऊ द्या! कर्नाटकच्या मंत्र्याने पीएम मोदींकडे मागितली परवानगी

Karnataka Minister BZ Zameer Ahmed Khan : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी परवानगी दिली तर पाकिस्तानविरुद्ध युद्ध लढण्यासाठी मी तयार आहे, असं त्यांनी जाहीर केलं.

Video : फिदायीन होईन, पाकिस्तानात जाऊ द्या! कर्नाटकच्या मंत्र्याने पीएम मोदींकडे मागितली परवानगी
मुंबई:

Karnataka Minister BZ Zameer Ahmed Khan : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. त्याचवेळी कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारमधील मंत्री जमीर अहमद खान यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी परवानगी दिली तर पाकिस्तानविरुद्ध युद्ध लढण्यासाठी मी तयार आहे, असं त्यांनी जाहीर केलं.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मी पाकिस्तानविरुद्ध हत्यार उचलण्यासाठी तयार आहे. माझी ही भावना म्हणजे काही मजा नाही, असंही त्यांनी सांगितलं. मी आत्मघातकी बनण्यास देखील तयार आहे. बॉम्ब बांधून जाईन आणि सर्वांना उडवून देईल, असं त्यांनी जाहीर केलं. पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटक ठार झाले. त्यामध्ये कर्नाटकच्या काही पर्यटकांचाही समावेश आहे,

जमीर अहमद खान हे सिद्धरामय्या सरकारमध्ये गृहनिर्माण, वक्फ आणि अल्पसंख्याक कामकाज मंत्री आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, 'आपण भारतीय आहोत. आपण हिंदुस्थानी आहोत. आपला आणि पाकिस्तानचा काहीही संबंध नाही. जर त्यांच्याविरुद्ध युद्धाची वेळ आली तर मी लढायला तयार आहे. 

( नक्की वाचा : Pahalgam Terror Attack : साम, दाम, दंड, भेद... भारताची पाकिस्तानवर वार करणारी चाणक्य नीती काय आहे? )
 

एक मंत्री म्हणून त्यांनी मला पाठवलं तर मी आघाडीवर जाऊन लढायला तयार आहे. गरज पडली तर मी आत्मघातकी बॉम्ब (Sucide Bomb) घेऊन देखील जायला तयार आहे. मी मजेत सांगत नाहीय. देशाला माझी गरज असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मला आत्मघातकी बॉम्ब द्यावा. मी जॅकेट घालून पाकिस्तानमध्ये जाईल,' असं त्यांनी यावेळी जाहीर केलं. 

पाकिस्तानसोबत युद्ध करणे हा योग्य उपाय नसल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काही दिवसांपूर्वी म्हंटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर देशभरातून टीका झाली होती. त्यानंतर जमीर अहमद खान यांनी ही दुसऱ्या टोकाची मागणी केली आहे. 

पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत सिद्धरामय्या म्हणाले होते की. 'पाकिस्तानविरुद्ध युद्ध करण्याची कोणतीही गरज नाही. कडक सुरक्षा उपाययोजना करण्याची गरज आहे. आम्ही युद्धाच्या बाजूने नाहीत. तिथे शांतता असावी. लोकांना सुरक्षित वाटलं पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकारने योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे.'
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: