जाहिरात
This Article is From Apr 21, 2024

राजस्थानमध्ये भीषण अपघात ! ट्रॉलीची व्हॅनला धडक, 9 जणांचा मृत्यू

राजस्थानमध्ये भीषण अपघात ! ट्रॉलीची व्हॅनला धडक, 9 जणांचा मृत्यू
राजस्थानमध्ये भीषण अपघात ! ट्रॉलीची व्हॅनला धडक, 9 जणांचा मृत्यू
राजस्थान:

राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात एक मोठा अपघात झाला आहे. एका ट्रॉलीने व्हॅनला धडक दिली आहे. अकलेराजवळील पाचोळा गावात हा अपघात झाला. अकलेराजवळील पाचोळा गावात हा अपघात झाला. या व्हॅनमध्ये बागरी समाजाचे १० तरुण प्रवास करत होते, जे एका लग्न समारंभातून परतत होते. त्यापैकी 9 जणांचा मृत्यू झाला, तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील खिलचीपूर येथून एका लग्नाला उपस्थित राहून परतणाऱ्या तरुणांच्या व्हॅनला एका अनियंत्रित ट्रॉलीने धडक दिली. व्हॅनमध्ये बागरी समाजाचे 10 लोक होते. अकलेराजवळील पाचोळा गावाजवळ हा अपघात झाला. ट्रॉलीचा वेग खूप जास्त होता, त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले, आणि वॅनला धडक लागली. हा अपघात इतका भीषण होता की 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 6 जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला.

अपघातानंतर ट्रॉली चालकाने घटनास्थळावरून पळ काढली. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पोलिस त्याची चौकशी करत आहेत. अकलेरा पोलिस ठाण्याचे प्रभारी संदीप बिश्नोई यांनी सांगितले की, अकलेराजवळील डांगर गावातील बागरी समाजाचे लोक शनिवारी मध्य प्रदेशात त्यांच्या नातेवाईकाच्या लग्न समारंभासाठी गेले होते. दरम्यान, लग्नाच्या मिरवणुकीवरून परतत असताना त्यांच्या व्हॅनला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॉलीने धडक दिली.

या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पोलिसांनी मृतांचे मृतदेह अकलेरा येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात ठेवले आहेत. सर्व लोक बागरी समाजाचे असल्याचे स्टेशन प्रभारींनी सांगितले. सध्या पोलीस अपघाताचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी सांगितले की, अपघाताची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतरच पुढील कारवाई केली जाईल.

गेल्या काही दिवसांतील हा दुसरा मोठा अपघात असून, याआधीही क्षुल्लक कारणावरून पाच जणांचा डंपरने चिरडून मृत्यू झाल्याची घटना गंगाधर पोलीस ठाण्यात उघडकीस आली होती. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: