
Crime News: घर आणि मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षितेसाठी कुलूप महत्वाचं असतं. मात्र अडीच कोटींचं एक कुलूप सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. हैदारबाद एअरपोर्टवर अधिकाऱ्यांना हे कुलूप जप्त केलं आहे. कुलूप घेऊन प्रवास करणाऱ्या या प्रवाशाने अधिकाऱ्यांना भरकटवण्याचा खुप प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. आरोपींनी एकाला अटक केली आहे.
महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) याबाबत सांगितले की, गुरुवारी गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयच्या हैदराबाद युनिटच्या अधिकाऱ्यांनी कुवेतहून हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शारजाहला जाणाऱ्या एका प्रवाशाला अडवले.
प्रवाशाच्या सामानाची कसून तपासणी केली असता, एक कुलूप आढळून आले. अधिकाऱ्यांनी सुरुवातीला कुलूप दुर्लक्षित केले आणि इतर वस्तू तपासत राहिले. मात्र त्यांना काहीही सापडले नाही तेव्हा त्यांनी कुलूप उघडले. कुलूप उघडल्यानंतर अधिकारी आश्चर्यचकित झाले.
(नक्की वाचा- Pimpri Chinchwad: गुगल मॅपच्या मदतीने घरफोडी, पोलिसांचाही स्मार्ट तपास; दोघांना अटक)
ताले में छिपा रखा सोना...
— NDTV India (@ndtvindia) October 18, 2025
DRI ने हैदराबाद हवाई अड्डे पर 2.37 करोड़ रुपये का 1,798 ग्राम सोना जब्त किया#Hyderabad | #Video pic.twitter.com/dTGXB9TOmc
कुलूपातून पाच सोन्याच्या बार एका कुलूपात लपवण्यात आल्या होत्या आणि दोन सोन्याच्या बारचे कापलेले तुकडे सूर्यफुलाच्या बियांनी भरलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत लपवण्यात आले होते. हे सोने २४ कॅरेटचे होते, ज्याचे एकूण वजन 1798 ग्रॅम होते. कुलूपात लपवलेल्या सोन्याची किंमत 2.37 कोटी इतकी होती. जप्त केलेले तस्करी केलेले सोने, त्याच्या पॅकिंग साहित्यासह, जप्त करण्यात आले आणि प्रवाशाला सीमाशुल्क कायद्यानुसार अटक करण्यात आली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world