
बरेली येथील रमाडा हॉटेलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या बराच व्हायरल होत आहे. या हॉटेलच्या मुख्य प्रवेशद्वाराचे एका महिला कारचालकामुळे भयंकर नुकसान झाले. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. एका महिला वकिलाने चुकून हे कृत्य केले असून त्यामुळे हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेच्या व्हिडीओमध्ये एक कार रिव्हर्समध्ये येत हॉटेलचा काचेचा दरवाजा तोडून आत घुसत असल्याचे दिसते आहे.
( नक्की वाचा: धावत्या बाईकवर पुण्यातील जोडप्याचा रोमान्स, दुचाकीवरच्या टाकीवरील महिलेनं जे केलं.... पाहा Video )
नेमकं काय घडलं ?
ही घटना शुक्रवार रात्रीची असल्याचे सांगितले जात आहे. एक महिला वकील रमाडा हॉटेलमध्ये जेवायला आली होती. जेवण झाल्यानंतर तिने पार्किंगमधून तिची कार मागवली होती. कार आल्यानंतर ती हॉटेलबाहेर पडत होती. मात्र हॉटेलच्या पोर्चमधून बाहेर पडत असताना तिने पुढे जाण्यासाठीचा गिअर टाकण्याऐवजी रिव्हर्स गिअर टाकला. यानंतर ही गाडी अनियंत्रित झाली आणि रमाडा हॉटेलचा काचेचा मुख्य दरवाजा तोडून आत घुसली. ही कार अनियंत्रित होऊन काचेचा दरवाजा तोडून घुसत असताना पोर्चमध्ये उभी असलेली माणसे आणि सुरक्षा रक्षक घाबरून दूर झाले, ज्यामुळे मोठा अपघात टळला.
Bareilly: A woman lawyer lost control while reversing her car, crashed through the main gate of Hotel Ramada, and drove inside.
— Deadly Kalesh (@Deadlykalesh) July 29, 2025
Glass shattered, people ran to save themselves. CCTV footage has surfaced.
pic.twitter.com/tsWt9T766t
पोलीस अधिकाऱ्यांनी सदर घटनेचा तपास केला आणि त्यात घातपाताच्या हेतून हे कृत्य केले नसून ही चुकीने झालेली गोष्ट असल्याचे म्हटले आहे. महिला वकिलाने आपली चूक कबूल केली असून तिने हॉटेलची नुकसानभरपाई करण्याचे मान्य केले. यामुळे हे प्रकरण मिटवण्यात आले असून हॉटेल प्रशासनाने नवी काच लावून दुरुस्ती काम तत्काळ पूर्ण केले आहे. हॉटेलचे मालक सौरभ मेहरोत्रा यांनी ही घटना महिला वकिलाच्या चुकीमुळे झाली असून त्याला दुसरा रंग देणे योग्य ठरणार नाही असे म्हटले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world