जाहिरात
This Article is From Apr 06, 2024

हलाल डेटिंग काय आहे?  इस्लाम याची परवानगी देतो का?

जगात डेटिंग शब्द खूप कॉमन आहे. दोन व्यक्तींमध्ये सुरुवातीच्या पातळीवर ज्या भेटी-गाठी होतात त्याला डेटिंग म्हटलं जातं. हे नातं घनिष्ठ नसलं तरी एकमेकांना समजून घेण्यासाठी या भेटी आवश्यक मानल्या जातात. पण इस्लाममध्ये हलाल डेटिंगला काय समजलं जातं?

हलाल डेटिंग काय आहे?  इस्लाम याची परवानगी देतो का?
नवी दिल्ली:

जगात डेटिंग शब्द खूप कॉमन आहे. दोन व्यक्तींमध्ये सुरुवातीच्या पातळीवर ज्या भेटी-गाठी होतात त्याला डेटिंग म्हटलं जातं. हे नातं घनिष्ठ नसलं तरी एकमेकांना समजून घेण्यासाठी या भेटी आवश्यक मानल्या जातात. पण इस्लाममध्ये हलाल डेटिंगला काय समजलं जातं? अनेक मुस्लीम देशांमध्येही याला मान्यता मिळू लागली आहे.

इस्लामिक विद्वानांचा असा विश्वास आहे की, इस्लामिक तत्त्वांचे पालन करताना हलाल डेटिंग केली जाऊ शकते, विशेषत: जर तुम्ही जीवनसाथीच्या शोधत असाल. हलाल हा अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ 'परवानगी' किंवा 'वैध' असा होतो. इस्लामिक कायद्यात परवानगी असलेल्या गोष्टींच्या वापरासाठी हा शब्द वापरला जातो. कुराणमध्ये, हलाल हा शब्द हराम (निषिद्ध) च्या विरूद्ध वापरला गेला आहे.

हलाल म्हणजे जे कायदेशीर आहे आणि ज्याला इस्लाममध्ये परवानगी आहे आणि जे योग्य आहे. हराम म्हणजे जे बेकायदेशीर आहे, जे योग्य मानले जात नाही. इस्लाममध्ये परवानगी नसलेली किंवा निषिद्ध असलेली कोणतीही गोष्ट हराम मानली जाते. हलाल हा शब्द प्रामुख्याने त्यांच्या अन्न पदार्थासंदर्भासाठी वापरले जातात. मुस्लीम धर्मात काही गोष्टी न खाण्याबाबत कठोर नियम करण्यात आले आहेत. म्हणजे काही पदार्थ खाणे मुस्लीम धर्मात हराम मानले जाते.

1974 मध्ये कत्तल केलेल्या मांसासाठी हलाल सर्टिफिकेशन पहिल्यांदा सुरू करण्यात आले. 1993 पर्यंत ते फक्त मांस उत्पादनांवर लागू होते. मग ते इतर खाद्यपदार्थ आणि सौंदर्यप्रसाधने, औषधे इ.पर्यंत वाढवण्यात आले. 

हलाल डेटिंग काय आहे?
हलाल डेटिंगला इंडोनेशिया आणि मलेशिया सारख्या मुस्लीम देशांमध्ये मान्यता मिळू लागली आहे. खरं तर, हलाल डेटिंग इस्लामिक तत्त्वांचे आणि नियमांचे पालन करून साथीदार शोधण्याच्या हेतूने घेतलेल्या भेटी-गाठी संदर्भातील आहे. काहींचा असाही युक्तिवाद आहे की, जर डेटिंग इस्लामिक तत्त्वांनी ठरवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असेल तर ते हलाल असू शकते. काही लोकांचा असाही विश्वास आहे की, लग्नाच्या बाहेर कोणत्याही प्रकारचे डेटिंग करणे हराम आहे.

ही डेटिंग कशी असावी?
वेळ आणि तारीख आधीच निश्चित केलेली असावी. ते जास्त लांब नसावे. आपण फक्त एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या पवित्रतेची आणि व्यक्तिमत्त्वाची काळजी घेतली पाहिजे.

स्पीड हलाल डेटिंग काय आहे, मलेशियामध्ये  लोकप्रिय होत आहे?
हा मलेशियातील एक मॅचमेकिंग कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मलेशियातील मुस्लिमांना मोठ्या प्रमाणात साथीदार शोधण्यास मदत होत आहे.  लोक इथं भेटतात. बोलून आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. मलेशियामध्ये प्रेमसंबंध देखील फारसे रुचत नाही. स्पीड डेटिंगमध्ये महिला डेटर्सना एक पालक असतो जो त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचं काम करतो.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com