जाहिरात

विद्यार्थिनीला कॉलेजमध्ये घुसून तरुणाकडून मारहाण, मग पोलिसांची एन्ट्री; पाहा 'Before - After' व्हिडीओ 

मुजफ्फरनगरच्या एसडी डिग्री कॉलेज परिसरात ही घटना घडली. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार,  बीएच्या पहिल्या वर्षात ती शिकते. तिचा तिच्या मेत्रिणीसोबत काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्यानंतर 14 मे रोजी मैत्रिणीने पीडित तरुणीला धमकी दिली होती. 

विद्यार्थिनीला कॉलेजमध्ये घुसून तरुणाकडून मारहाण, मग पोलिसांची एन्ट्री; पाहा 'Before - After' व्हिडीओ 

Uttar Pradesh News : मुजफ्फरनगरमध्ये एका विद्यार्थीनीला तरुणाकडून होत असलेल्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 14 सेकंदाच्या या व्हिडीओत तरुण या विद्यार्थीनीला सपासप थोबाडीत मारताना दिसत आहे. अखेर एक विद्यार्थी मध्यस्थी करतो आणि विद्यार्थीनीला तरुणाच्या तावडीतून सोडवतो. 

15 मे रोजी हा सगळा प्रकार घडला होता. विद्यार्थिनीच्या मैत्रिणीने तिच्या प्रियकरासह तिला मारहाण केल्याचे समोर आले आहे. पीडित विद्यार्थीनीने याबाबत शिक्षकाकडे तक्रार केली. मात्र कॉलेजबाहेरचा विषय असल्याचं सांगून शिक्षकांनी या प्रकरणातून अंग काढून घेतलं.  अखेर विद्यार्थीनीने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. 

(नक्की वाचा-  Pune News : सुनेची आत्महत्या, छळ केल्याचा आरोप; राष्ट्रवादीच्या नेत्यासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल)

पाहा VIDEO

विद्यार्थीनीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आपल्या खास शैलीत मारहाण करणाऱ्या तरुणाला धडा शिकवला. तरुणीवर हात उचलून मर्दुमकी दाखवणाऱ्या तरुणाला पायावर उभंही राहता येत नव्हतं, अशी अवस्था पोलिसांनी केली.. पोलिसांचा आधार घेत हा तरुण चालत होता. पोलिसांचा चोप मिळाल्यानंतर 'माझ्याकडून चूक झाली' असं मारहाण करणारा तरुण बोलत होता. या घटनेचा 'Before आणि After' व्हिडीओ आता समोर आला आहे. 

(नक्की वाचा-  Joe Biden : अमेरिकेच माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सरची लागण, हाडांमध्ये पसरल्याने चिंता)

काय आहे प्रकरण?

मुजफ्फरनगरच्या एसडी डिग्री कॉलेज परिसरात ही घटना घडली. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार,  बीएच्या पहिल्या वर्षात ती शिकते. तिचा तिच्या मेत्रिणीसोबत काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्यानंतर 14 मे रोजी मैत्रिणीने पीडित तरुणीला धमकी दिली होती. 

त्यानुसार तिने बॉयफ्रेंडसोबत मिळून मारहाण केली. पीडित तरुणीच्या मैत्रिणीने तिला कॉलेजच्या ऑडिटोरिमकडे नेले, जिथे कॅमेरा नव्हता. तिथे तिने आणि तिच्या प्रियकराने तरुणीला मारहाण केली. अखेर तिथे उपस्थित एक तरुण मधे पडला आणि तरुणीला वाचवलं. व्हिडिओत दिसत आहे, आरोपी तरुणीला एकामागून एक सलग थोबाडीत मारत आहे. ती विद्यार्थिनी मदतीसाठी ओरडत आहे. पण तो तरुण मारहाण करणे थांबवत नाही. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com