जाहिरात

ऑगस्ट महिन्यात 1 दिवसाचा OFF अन् 4 दिवसांच्या सुट्टीची मजा; Long Weekend कधी आहे, कुठे प्लान कराल?

August Long Weekend 2025: यावर्षी आपल्याला ऑगस्ट महिन्यात एका Long Weekend ची सुवर्णसंधी मिळत आहे.

ऑगस्ट महिन्यात 1 दिवसाचा OFF अन् 4 दिवसांच्या सुट्टीची मजा; Long Weekend कधी आहे, कुठे प्लान कराल?
August Long Weekend Holiday:
मुंबई:

Travel: ऑफिसला जाणाऱ्या नोकरदारवर्गाला दर महिन्यात विकेंडच्या सुट्टीशिवाय वेगळ्या सुट्ट्या घेणं कठीण असतं. अशावेळी नोकरदारवर्गाला Long Weekend ची प्रतीक्षा असते. रक्षाबंधनाच्या आठवड्यात सलग दोन सुट्ट्या आहेत.  त्याच्या पुढच्या आठवड्यात म्हणजे स्वातंत्र दिन असललेल्या आठवड्यात चार दिवसांच्या एकत्रित सुट्ट्या आहेत. ज्यांना केवळ रविवारी सुट्टी असले तर आणखी एक सुट्टी घेऊन Long Weekend सेलिब्रेट करू शकतात. 15 ऑगस्ट, शुक्रवारी स्वातंत्र्य दिवस आहे. ज्या दिवशी सर्वांना सुट्टी असते.

याच्या दुसऱ्या दिवशी 16 ऑगस्टला गोपाळकाला आहे. या दिवशीही कार्यालयांना सुट्टी असते. याच्या पुढच्या दिवशी 17 ऑगस्टला रविवार आहे, जो सुट्टीचा दिवस असतो. आणि याच्या दुसऱ्या दिवशी 18 ऑगस्टला, सोमवारी सुट्टी मिळाली तर Long Weekend ची मजा घेता येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला एकत्रितपणे 15, 16, 17 आणि 18 ऑगस्टला सुट्टी मिळेल. अशात या लाँग विकेंडला ट्रिप प्लान करू शकता. या लाँग विकेंडवर कुठे कुठे जाऊ शकता ते पाहूया...

Changes From August:  कामाची बातमी! आजपासून 'हे' 5 नियम बदलणार, तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

नक्की वाचा - Changes From August: कामाची बातमी! आजपासून 'हे' 5 नियम बदलणार, तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?


लॉन्ग विकेंडला या ठिकाणांवर ट्रिप करा प्लान | Long Weekend Trip Ideas

गोवा 

चार दिवसांच्या सुट्टीसाठी गोवा हा चांगला प्लान ठरू शकतो. मुंबई-पुणेकरांना चार दिवसांच्या विकेंडसाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो. सध्या श्रावण सुरू आहे. त्यामुळे कोकणातील निसर्ग बहरून गेला आहे. अशा स्थितीत गोव्यात बिचवर मज्जा करता येऊ शकेल. याशिवाय गोव्यातील खाद्यपदार्थांचा आनंद घेता येऊ शकेल. निसर्ग खुलला असल्याने मित्रांसोबत केलेली रोड ट्रिप स्मरणात राहील हे नक्की. 

हम्पी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेजवळ असलेलं हम्पी हा देखील चार दिवसांच्या सुट्टीसाठी चांगला पर्याय आहे. हम्पी तसं रस्तेमार्गाने जाता येऊ शकतं. मात्र तुम्ही ट्रेन किंवा बसचा पर्यायही घेऊ शकता. हम्पीमध्ये अंजनेयद्री हिलवर छान ट्रेकचा आनंदही घेऊ शकता. तेथील वास्तू श्रावणात अधिकच आकर्षक दिसेल. 

कुर्ग, कर्नाटक 

कूर्गला 'भारताचे स्कॉटलंड' असंही म्हटलं जातं. पावसाळ्यात येथील हिरवळ आणि कॉफीच्या बागांचे दृश्य अद्भुत असते. राजाची सीट, अ‍ॅबे फॉल्स आणि नामद्रोलिंग मठ हे मुख्य आकर्षण आहेत. पावसाळ्यात येथील दऱ्या आणि धबधबे आणखी सुंदर दिसतात.

तोरणमाळ

जर तुम्हाला फार गर्दीच्या ठिकाणी जायचं नसेल तर हा तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे. नंदूरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे अत्यंत सुंदर असं हिल स्टेशन आहे. तोरणमाळमध्ये अद्याप व्यावसायिकीकरण झालेलं नाही. त्यामुळे ज्यांना अस्सल निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल ते येथे जाऊ शकतात. तोरणमाळला जाण्यासाठी तुम्ही मुंबईहून रात्री धुळ्याची बस घेऊ शकतात. पहाटे धुळ्याला पोहोचल्यानंतर तुम्ही रस्तेमार्गाने तोरणमाळला पोहोचाल. यादरम्यान तुम्ही नर्मदा नदीच्या बॅकवॉकरलाही जाऊ शकता. हे ठिकाण पर्यटकांपासून दूर आहे. त्यामुळे केवळ तुमचा ग्रुप येथे एन्जॉय करू शकतो. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com