
Lunar Eclipse 2025: चंद्र ग्रहण एक खगोलीय घटना आहे. जेव्हा पृथ्वी चंद्र आणि सूर्याच्या मधोमध येते, तेव्हा ग्रहणाची परिस्थिती तयार होते. चंद्र ग्रहण पौर्णिमेच्या दिवशी लागते. चंद्रग्रहणामध्ये सूर्यप्रकाश चंद्रापर्यंत पोहोचत नाही. खग्रास चंद्रग्रहण (Total Lunar Eclipse), खंडग्रास चंद्रग्रहण (Partial Lunar Eclipse), आणि उपछाया चंद्रग्रहण (Penumbral Lunar Eclipse) असे चंद्र ग्रहणाचे तीन प्रकार आहेत. शनिवारी (9 ऑगस्ट) पौर्णिमेचा दिवस आहे आणि अशा परिस्थितीत म्हटले जातंय की रक्षाबंधनाच्या (Raksha Bandhan 2025 )दिवशी चंद्र ग्रहण लागणार आहे. पण यंदाच्या वर्षातील चंद्र ग्रहण आज लागणार नाहीय. चंद्र ग्रहण कधी लागणार आहे, वेळ काय असेल आणि भारतात दिसणार की नाही? याबाबत माहिती जाणून घेऊया...
यंदाचे चंद्र ग्रहण कधी असणार आहे?| Chandra Grahan Kab Lagnar | Lunar Eclipse Time
2025मध्ये 7 सप्टेंबर रोजी चंद्र ग्रहण लागणार आहे. या दिवशी रविवार आहे. भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण चंद्र ग्रहण लागणार आहे. पृथ्वी पूर्णतः चंद्राला झाकते तेव्हा पूर्ण चंद्र ग्रहण लागते.
(नक्की वाचा: Raksha Bandhan 2025 Wishes: भाऊबहिणीचे नाते म्हणजे रुसणे, हसणे आणि जीवापाड प्रेम करणे;रक्षाबंधनानिमित्त पाठवा खास मेसेज)
चंद्र ग्रहणाची वेळ (Chandra Grahan Time)
7 सप्टेंबर रोजी लागणारे चंद्र ग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री 9:57 वाजता सुरू होईल आणि मध्य रात्री (8 सप्टेंबर) 1:26 (AM) वाजता समाप्त होईल.
ब्लड मून दिसणार (What Is Blood Moon)
हे वर्षातील दुसरे चंद्र ग्रहण असणार आहे, यास ब्लड मून (Blood Moon) असेही म्हणतात. ब्लड मून म्हणजे प्रत्यक्षात चंद्र लाल रंगाचा दिसत नाही. पण पूर्ण चंद्र ग्रहणामध्ये पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा वातावरणातील धूळ, वायू अन्य पदार्थांच्या माध्यमातून सूर्यप्रकाश चंद्रापर्यंत पोहोचतो तेव्हा पृथ्वीच्या सावलीमुळे चंद्र लाल किंवा नारिंगी रंगाचा दिसू लागतो, त्यास ब्लड मून म्हणतात.
(नक्की वाचा: Happy Raksha Bandhan 2025 Wishes: राखीचा धागा म्हणजे प्रेमाचा अतूट विश्वास! रक्षाबंधनानिमित्त भाऊबहिणीला पाठवा खास मेसेज)
जगभरात चंद्र ग्रहण कोकोणत्या देशांमध्ये दिसणार? (Chandra Grahan 2025 Visibility In The World)
चंद्र ग्रहण जगभरातील कित्येक भागांमध्ये दिसणार आहे. आशिया, ऑस्ट्रेलिया, यूरोप, न्यूझीलँड, वेस्टर्न अँड नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका यासारख्या काही भागांमध्ये आणि आफ्रिकेमध्येही चंद्र ग्रहण दिसणार आहे.
चंद्र ग्रहण भारतामध्ये दिसणार आहे का? (Lunar Eclipse Visibility In India)
वर्षातील दुसरे चंद्र ग्रहण भारतामध्येही पाहायला मिळणार आहे.
सुतक काळ (Chandra Grahan Sutak Kaal)सुतक काळा अशुभ मानला जातो. सुतक काळ ग्रहण लागण्यापूर्वी 9 तासांपूर्वी सुरू होतो. सुतक काळात अनेक कामे करण्यास मनाई केली जाते. 7 सप्टेंबर 2025 रोजी लागणारे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. म्हणूनच या ग्रहणाचा सुतक काळ वैध असेल.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world