जाहिरात

Ganesh Chaturthi 2024: पार्थिव गणेश म्हणजे काय, याच मूर्तीची पूजा करणे का असते शुभ? जाणून घ्या शास्त्र

Ganesh Chaturthi 2024: पार्थिव गणेश म्हणजे काय? पार्थिव गणेश मूर्ती कशी तयार करतात? जाणून घ्या सर्व माहिती...

Ganesh Chaturthi 2024: पार्थिव गणेश म्हणजे काय, याच मूर्तीची पूजा करणे का असते शुभ? जाणून घ्या शास्त्र

Ganesh Chaturthi 2024: गणपती देवता ही मांगल्याचे प्रतीक आहे, यामुळे बाप्पाची पूजा केली जाते तसेच गणेश चतुर्थीला बाप्पाची विधीवत स्थापनाही केली जाते. परंपरांनुसार, पार्थिव गणेश पूजनाला अधिक मान्यता आहे. पृथ्वीपासून म्हणजेच मातीपासून तयार केलेली गणेशमूर्ती म्हणजे पार्थिव गणेश (Parthiva Ganesh). पार्थिव गणेश मूर्तीचीच (Parthiva Ganesh Pujan) स्थापना करणे शुभ मानले जाते. 

गणेश पूजनाचे साहित्य 

- अष्टगंध, हळद, कुंकू, अबीर, गुलाल, रांगोळी, सुटी नाणी 25 

- विड्याची पाने 20, सुपारी 20 (हळकुंड, अक्रोड, बदाम, खारीक प्रत्येकी पाच), खोबऱ्याची वाटी 1, गूळ, पंचामृत ( दूध, दही, तूप, मध, साखर), दोन कापसाची वस्त्रे , जानवी जोड दोन, अत्तर, काडेपेटी, अगरबत्ती आणि अगरबत्तीचे घर, धूप, कापूर, आरतीचे ताट, तेल / तूप, दोन समई, वाती - फुलवाती, दोन निरांजन, घंटा, शंख, गणेश मूर्ती, श्री गणेशाची प्रतिमा, एक चौरंग, बसण्यासाठी तीन आसने किंवा पाट, तांदूळ / गहू अर्धा किलो, दोन तांब्याच्या धातूचे तांबे, तांब्याचा पेला स्टीलचा पेला -दोन, एक तांब्याची पळी, एक स्टीलची पळी, दोन तांब्याचे ताम्हण, एक पंचा, एक ब्लाऊज पीस.

Ganesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजेबाबत सविस्तर माहिती

(नक्की वाचा: Ganesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजेबाबत सविस्तर माहिती)

- फुले : लाल कमळ, चाफा केवडा, मंदार, गोकर्ण, जाई, जास्वंद, शेवंती, गुलाब, पारिजातक 

- 21 पत्री, मोगरी, माका, बेल, पांढरी दुर्वा, बोरीचे पान, धोत्र्याची पाने, तुळस, शमी, आघाडा, डोरली, कण्हेर, रुई, अर्जुनसादडा, विष्णूक्रांता, डाळिंब, देवदार, पांढरा मरवा, पिंपळ, जाई, केवडा, अगस्तिपत्र.  

- प्रसाद साहित्य  
पेढे 100 ग्रॅम, मोदक 21, पाच  प्रकारची फळे, अर्धा डझन केळी.

गणेश पूजन कसे करावे?

- पंचांगकर्ते,खगोलअभ्यासक दा.कृ.सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यान्ह काळी गणेश पूजा करावी, असे शास्त्रात सांगितले आहे.

- 7 सप्टेंबर म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी 11 वाजून 22 मिनिटापासून  ते दुपारी 1 वाजून 50 मिनिटापर्यंत मध्यान्ह काळ आहे. 

- या काळादरम्यान पूजा करणे शक्य होत नसेल तर प्रातःकालापासून पहाटे 4 वाजल्यापासून दुपारी 1.50 वाजेपर्यंत गणेश पूजन करावे. 

- गणपती देवतेचे गुण अंगी यावे, यासाठी हे पूजन करावे.   

- षोडशोपचार पूजा करावी, असेही शास्त्रात म्हटले गेले आहे. 

- यानंतर आरती करावी. महत्त्वाचे म्हणजे अशुद्ध आरती म्हणू नये.  

- अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्र म्हणावे.

Ganesh Chaturthi 2024: कधी आहे गणेश चतुर्थी? गणेशोत्सवादरम्यान जुळून आले मोठे योग, जाणून घ्या माहिती

(नक्की वाचा : Ganesh Chaturthi 2024: कधी आहे गणेश चतुर्थी? गणेशोत्सवादरम्यान जुळून आले मोठे योग, जाणून घ्या माहिती)

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.