जाहिरात

Morning Tips: सकाळी उठल्यानंतर 20-20-20 नियम फॉलो करा, मेंदूला मिळतील इतके मोठे फायदे

Morning Tips: सकाळी उठल्यानंतर काही गोष्टी फॉलो केल्यास तुमच्या लाइफस्टाइलमध्ये सकारात्मक घडून येतील. यासाठी 20-20-20 चा नियम जाणून घेऊया...

Morning Tips: सकाळी उठल्यानंतर 20-20-20 नियम फॉलो करा, मेंदूला मिळतील इतके मोठे फायदे
"Morning Tips: सकाळी उठल्यानंतर 20-20-20 नियम फॉलो करा"
Canva

Morning Tips: सकाळी उठल्यानंतर बहुतांश लोकांना आळस, सुस्तपणा जाणवतो आणि ही सामान्य बाब आहे. आळसामुळेच बिछान्यातून बाहेर पडणं कठीण होते. अपुऱ्या झोपेमुळे दिवसभर थकवा जाणवतो. सकाळची सुरुवात चांगली आणि उत्साहपूर्ण झाल्यास तुमचा संपूर्ण दिवस सकारात्मक जाईल. पण सकाळची सुरुवात चांगली कशी करावी? असा प्रश्न तुम्हाला पडलाय का. या लेखाद्वारे आपण खास फॉर्म्युला जाणून घेऊया, ज्यामुळे तुमच्या जीवनात मोठे बदल घडण्यास मदत मिळेल. सकाळी उठल्यानंतर 20-20-20चा नियम फॉलो केल्यास कोणते फायदे मिळतील, जाणून घेऊया सविस्तर माहिती...  

20-20-20 नियम नेमके आहे तरी काय? 

20-20-20 नियम म्हणजे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला एका तासाचे 20-20-20 मिनिटांमध्ये विभाजन करायचंय. पहिली 20 मिनिटे सोप्या स्वरुपातील कार्डिओ एक्सरसाइज, योग किंवा मॉर्निंग वॉक करावा. यामुळे तुमचे हार्ट रेट वाढेल आणि शरीराला घाम येईल. ज्यामुळे संपूर्ण दिवस तुम्हाला अ‍ॅक्टिव्ह वाटेल. 

पुढील 20 मिनिटे 

पुढील 20 मिनिटांचा उपयोग लिखाणासाठी करावा. दिवसभराच्या कामांची यादी तयार करा, तुमच्या मनातील विचार लिहा किंवा एखाद्या गोष्टींमुळे तुम्ही अस्वस्थ असाल तर त्या कागदावर लिहून मन मोकळे करू शकता. योग्य पद्धतीने विचार करुन लक्ष केंद्रित करा. लिखाणामुळे विचारांमध्येही सुधारणा होते आणि मेंदू शांत होतो. 

Mexican Mint Benefits: पोटाच्या समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी वरदान आहेत ही हिरवी पाने, जाणून घ्या फायदे

(नक्की वाचा: Mexican Mint Benefits: पोटाच्या समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी वरदान आहेत ही हिरवी पाने, जाणून घ्या फायदे)

शेवटची 20 मिनिटे

शेवटची 20 मिनिटे तुम्ही एखादे पुस्तक वाचू शकता किंवा तुमच्या आवडीचा विषय अथवा पॉडकास्ट ऐकावा. असे केल्यास मेंदूची कार्यप्रणाली सक्रिय राहण्यास मदत मिळते.  

Health Benefits Of Eating Curd Daily: सलग 30 दिवस दही खाल्ल्यास मिळतील हे 5 मोठे फायदे

(नक्की वाचा: Health Benefits Of Eating Curd Daily: सलग 30 दिवस दही खाल्ल्यास मिळतील हे 5 मोठे फायदे)

सकाळी उठल्यानंतर काय करू नये?

  • सकाळी उठल्यानंतर फोन पाहणं टाळावं. 
  • रिकाम्या पोटी चहा पिणे टाळावे, यामुळे अ‍ॅसिडिटी होऊ शकते. 
  • सकाळी-सकाळी पोटाशी संबंधित समस्या निर्माण झाल्यास तुमचा संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो.
  • नकारात्मक विचार करणं टाळावं. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com