जाहिरात

Liquid Nitrogen Cocktail: धुराचं कॉकटेल की विष? लिक्विड नायट्रोजन ड्रिंक्सचं सत्य तुम्हाला माहिती असणं गरजेचंच

Liquid Nitrogen Cocktail: टेबलावर ठेवलेलं ड्रिंक आणि त्यातून बाहेर पडणारा पांढऱ्या रंगाचा धूर, हे लिक्विड नायट्रोजन ड्रिंक्स जितके आकर्षक दिसतात, आरोग्यासाठी तितकेच हानिकारक आहेत.

Liquid Nitrogen Cocktail: धुराचं कॉकटेल की विष? लिक्विड नायट्रोजन ड्रिंक्सचं सत्य तुम्हाला माहिती असणं गरजेचंच
"Liquid Nitrogen Cocktail: लिक्विड नायट्रोजन ड्रिंक नाही तुम्ही विष पिताय"
Canva AI

Liquid Nitrogen Cocktail: रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर तुम्ही देखील सर्वात आधी लिक्विड नायट्रोजन ड्रिंक ऑर्डर करत असाल तर जरा थांबा. हे ड्रिंक जितके आकर्षक दिसतं, आरोग्यासाठीही तितकेच धोकादायक ठरू शकतं. सोशल मीडिया आणि पार्टीमध्ये सध्या हे ड्रिंक ट्रेंडमध्ये आहे. क्षणभर आनंद देणाऱ्या या ड्रिंकची धक्कादायक बाजू तुम्हाला माहितीय का? लिक्विड नायट्रोजन ड्रिंक पिणे खरंच सुरक्षित आहे की हा जीवघेणा अनुभव ठरू शकतो? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

लिक्विड नायट्रोजन म्हणजे काय? (What Is Liquid Nitrogen?)

लिक्विड नायट्रोजन म्हणजे नायट्रोजन गॅस, जो अतिशय थंड करून त्यास द्रवरुप दिले जाते. या गॅसचा बॉयलिंग पॉइंट (Boiling point) जवळपास -195.8 डिग्री सेल्सिअस इतका असतो. इतक्या कमी तापमानात या गॅसच्या संपर्कात कोणतीही गोष्टी आल्यास ते त्वरित गोठू शकते. प्रयोगशाळा, वैद्यकीय उपचार, कम्प्युटर थंड करण्यासाठी किंवा जैविक नमुने सुरक्षित ठेवण्यासाठी या गॅसचा वापर केला जातो.

पेय आणि खाद्य पदार्थांमध्ये का केला जातोय वापर? (Why Liquid Nitrogen Is Used In Food And Drinks?)

रेस्टॉरंट आणि बारमध्ये लिक्विड नायट्रोजनचा वापर खाद्यपदार्थ-ड्रिंक त्वरित थंड करण्यासाठी तसेच स्मोकी इफेक्ट्ससाठी वापरले जाते. आइस्क्रीम पटकन गोठवण्यासाठी किंवा पेय अधिक आकर्षक दिसण्याच्या उद्देशाने या गॅसचा वापर केला जातोय. लिक्विड नायट्रोजनचे पूर्णपणे बाष्पीभवन झाल्यानंतर त्याचे शरीरावर कोणतेही परिणाम होत नाही, अशा स्थितीतील गॅस थोडा कमी धोकादायक मानला जातो.

लिक्विड नायट्रोजन ड्रिंक पिणे धोकादायक आहे का? ? (Why is Drinking Liquid Nitrogen Dangerous?)

लिक्विड नायट्रोजनचे पूर्णपणे बाष्पीभवन होण्यापूर्वीच ड्रिंक प्यायले तर समस्या निर्माण होऊ शकतात. शरीरात गेल्यानंतर लिक्विड नायट्रोजनचं जलदगतीने गॅसमध्ये रुपांतर होते आणि आणि त्याचे प्रमाण शेकडो पटीने वाढते, ज्यामुळे शरीरास पुढील धोका निर्माण होऊ शकतो:

  • तोंड, घसा आणि पोटाच्या भागातील टिशूंचे गंभीर स्वरुपात नुकसान होऊ शकते.
  • पोटाच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात ताण येऊ शकतो.
  • पोटाच्या भागातील अवयवांना छिद्रे पडू शकतात.
  • अंतर्गत रक्तस्त्राव होऊन जीवघेणा धोका निर्माण होऊ शकतो.
  • म्हणूनच तज्ज्ञ कोणत्याही परिस्थितीत लिक्विड नायट्रोजनचे थेट सेवन न करण्याचा सल्ला देतात.

Smelly Urine Causes: लघवीला घाणेरडा वास का येतो? मिठाच्या अति सेवनाव्यतिरिक्त या 3 गोष्टीही असू शकतात कारणीभूत

(नक्की वाचा: Smelly Urine Causes: लघवीला घाणेरडा वास का येतो? मिठाच्या अति सेवनाव्यतिरिक्त या 3 गोष्टीही असू शकतात कारणीभूत)

मॉस्कोतील घटना म्हणजे धोक्याचा इशारा (Moscow Incident: A Shocking Warning)

नुकतेच मॉस्कोमध्ये ख्रिसमस पार्टीदरम्यान एक व्यक्ती लिक्विड नायट्रोजन कॉकटेल प्यायला. शेफने यासंदर्भातील धोक्यांबाबत त्याला कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही. ड्रिंक पिताच त्याच्या पोटात दुखू लागलं. पोटामध्ये गॅस जलदगतीने पसरला आणि त्याचे पोटच फाटलं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. यानंतर तातडीने ICU विभागात दाखल करून त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. ही घटना म्हणजे लिक्विड नायट्रोजन ड्रिंक पिणे आरोग्यासाठी किती हानिकारक ठरू शकते, याचे उदाहरण आहे.

How To Stop Overthinking: मन भरकटतंय? राग-अतिविचार करतंय? रोज 5 मिनिटांचा उपाय करा, मनाच्या औषधामुळे होईल चमत्कार

(नक्की वाचा: How To Stop Overthinking: मन भरकटतंय? राग-अतिविचार करतंय? रोज 5 मिनिटांचा उपाय करा, मनाच्या औषधामुळे होईल चमत्कार)

लिक्विड नायट्रोजन ड्रिंक पिणे सुरक्षित ठरू शकते का? (Can Liquid Nitrogen Drinks Be Safe?)
  • लिक्विड नायट्रोजनचे पूर्णपणे बाष्पीभवन झाले असेल.
  • ग्लासातील पेयामध्ये धूर किंवा बुडबुडे दिसत नसतील.
  • पेय पिण्यापूर्वी पुरेसा वेळ द्यावा.

भारतात FSSAI मार्गदर्शक तत्त्वांनुसार, लिक्विड नायट्रोजनचा वापर फक्त प्रक्रिया आणि एखादी गोष्ट गोठवण्यासाठी केला जाऊ शकतो, थेट सेवनासाठी नाही.

तुम्हालाही कोणी स्मोकी कॉकटेल प्यायल्या दिल्यास पेयाच्या दिसण्यास भुलू नका त्याऐवजी आपल्या आरोग्यास महत्त्व द्यावे.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com