जाहिरात

Smelly Urine Causes: लघवीला घाणेरडा वास का येतो? मिठाच्या अति सेवनाव्यतिरिक्त या 3 गोष्टीही असू शकतात कारणीभूत

Smelly Urine Causes: लघवीला घाणेरडा वास का येतो, काय असतात यामागील कारणं, जाणून घेऊया डॉक्टर एन के सुरी यांनी दिलेली माहिती... 

Smelly Urine Causes: लघवीला घाणेरडा वास का येतो? मिठाच्या अति सेवनाव्यतिरिक्त या 3 गोष्टीही असू शकतात कारणीभूत
"Urine Odor Causes: लघवीला घाणेरडा वास येण्यामागील कारणं?"
Canva

Smelly Urine Causes: तुमच्या लघवीला घाणेरडा वास येता का? या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर समस्येकडे दुर्लक्ष करू नका. कारण लघवीच्या रंगातील बदल, लघवीचे प्रमाण आणि लघवीला येणारा वास याद्वारे आरोग्याशी संबंधित समस्यांबाबत संकेत मिळतात. लघवीला येणाऱ्या वासामुळे समस्येमुळे त्रस्त असाल आणि त्यामागील कारणं जाणून घ्यायचीय असतील हा लेख शेवटपर्यंत वाचा. डॉ. एन.के.सुरी यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिलीय...

लघवीला घाणेरडा वास येणे, कोणत्या आजाराचे लक्षण आहे? | Smelly Urine Symptoms

पाण्याची कमतरता

शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होणे, यास डिहायड्रेशन असं म्हणतात. डिहायड्रेशनच्या समस्येमुळेही लघवीला वास येऊ शकतो. शरीर डिहायड्रेट होते त्यावेळेस लघवी जाड होते, याच कारणामुळे लघवीला दुर्गंध येतो. म्हणून नियमित कमीत कमी सात ते आठ ग्लास पाणी प्यावे.  

कांदा, लसूणचे अति सेवन

जे लोक नियमित कांदा आणि लसणाचे जास्त प्रमाणात सेवन करतात, त्यांच्याही लघवीला दुर्गंध येऊ शकतो. डॉ. एन.के. सुरी यांच्या माहितीनुसार, जी मंडळीची आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात मिठाचे सेवन करतात, त्यांच्या लघवीलाही घाणेरडा वास येऊ शकतो.  

How To Stop Overthinking: मन भरकटतंय? राग-अतिविचार करतंय? रोज 5 मिनिटांचा उपाय करा, मनाच्या औषधामुळे होईल चमत्कार

(नक्की वाचा: How To Stop Overthinking: मन भरकटतंय? राग-अतिविचार करतंय? रोज 5 मिनिटांचा उपाय करा, मनाच्या औषधामुळे होईल चमत्कार)

लघवीमार्गातील संसर्ग 

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमुळेही लघवीला वास येऊ शकतो. लघवी करताना किंवा लघवीच्या ठिकाणी वेदना-जळजळ होत असल्यास, वारंवार लघवी होणे, संसर्ग या गोष्टीही लघवीला दुर्गंध येण्यास कारणीभूत ठरू शकतात. तुम्ही यापैकी कोणत्याही समस्येचा सामना करत असाल तर तातडीने डॉक्टरांना संपर्क साधावा. 

Liver Health: फक्त दारूच नव्हे तर अपुऱ्या झोपेसह 7 वाईट सवयी तुमच्या लिव्हरसाठी घातक, आजच करा हे बदल अन्यथा...

(नक्की वाचा: Liver Health: फक्त दारूच नव्हे तर अपुऱ्या झोपेसह 7 वाईट सवयी तुमच्या लिव्हरसाठी घातक, आजच करा हे बदल अन्यथा...)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com