
Navel Displacement News: नाभी आपल्या शरीराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. आयुर्वेद आणि योगशास्त्रानुसार नाभी ऊर्जेचे केंद्र मानले जाते. आयुर्वेदिक माहितीनुसार, नाभीशी शरीराच्या 72 हजार नाड्या जोडलेल्या असतात. कित्येकदा काही कारणांमुळे नाभी जागेवरुन सरकते. यास 'नाभी दोष' किंवा 'नाभी सरकरणे' असे म्हणतात. ही कोणतीही गंभीर परिस्थिती नाही. पण यामुळे शरीराशी संबंधित काही समस्या निर्माण होऊ शकतात. योगासने आणि काही घरगुती उपाय केल्यास या समस्येतून सुटका मिळू शकते. नाभी सरकलीय की नाही? कोणते उपाय करावे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
तज्ज्ञांनी काय सांगितलं?
NDTVसोबत केलेल्या खास बातचितमध्ये जागतिक स्तरावरील योग शिक्षक, लेखक आणि अखंड योग इन्स्टिट्युटचे संस्थापक डॉ. योगऋषी विश्वकेतु यांनी सांगितले की, जेव्हा नाभी जागेवरुन सरकरते, तेव्हा शरीरामध्ये काही सामान्य लक्षणं दिसू लागतात. उदाहरणार्थ...
- वारंवार पोटदुखी किंवा पोटामध्ये पेटके येणे
- भूक न लागणे किंवा अचानक जास्त प्रमाणात भूक लागणे
- बद्धकोष्ठता किंवा जुलाब लागणे
- पोट फुगणे किंवा गॅसची समस्या होणे
- थकवा जाणवणे
- अस्वस्थ वाटणे
- पाठ किंवा कंबरदुखी होणे
काही प्रकरणांत काही महिलांमध्ये मासिक पाळी अनियमित होण्याची आणि भावनिक असंतुलन होण्याची देखील समस्या दिसून येऊ शकते.
(नक्की वाचा: Navel Oiling Benefits: 21 दिवस नाभीवर तेल लावल्यास काय होते? Dr. Hansa Yogendra यांनी सांगितले कोणते तेल वापरावे)
नाभी का सरकते?
डॉ. योगऋषींनी दिलेल्या माहितीनुसार -
- अचानक जास्तीचे वजन उचलणे
- एका बाजूला वाकून एखादी वजनदार वस्तू उचलणे
- कधीतरी पडणे किंवा जखम होणे
- खूप जास्त नैराश्य येणे
- पोटातील स्नायू कमकुवत होणे किंवा सैल पडणे
नाभी सरकल्यास काय करावे?
डॉ. योगऋषींच्या माहितीनुसार, आयुर्वेद आणि योगमध्ये नाभीची जागा संतुलित करण्यासाठी कित्येक सोपे तसेच प्रभावी उपाय आहेत.
(नक्की वाचा: Navel Oiling Benefits: नाभीमध्ये तेलाचे थेंब सोडण्याचे मोठे फायदे)
योगासनांची मदत घ्यावी
नाभी जागच्या जागी आणण्यासाठी काही योगासनांची मदत घेऊ शकता. उदाहरणार्थ -
धनुरासनामुळे (Bow Pose) पोट आणि पाठीच्या कण्याचे स्नायू मजबूत होतील.
मंडुकासन (Frog Pose)
पचनशक्ती सुधारते आणि नाभी क्षेत्र सक्रीय होते.
अर्ध मत्स्येंद्रासन (Twisting Pose) किंवा चंद्रासन (Crescent Pose)
शरीराच्या दोन्ही बाजूच्या अवयवांना फायदा होईल
अर्ध पवनमुक्तासन (Ardha Pavanamuktasana)
पोटातील गॅस बाहेर निघण्यास आणि नाभीची शिथिल होण्यास मदत मिळू शकते.
या गोष्टी देखील ठेवा लक्षात
- नियमित ताठ बसावे आणि झोपताना कमरेला आधार देऊन झोपावे.
- एका बाजूला वाकून कोणतेही काम करू नये.
- जेवण वेळेवर करावे.
- तणाव घेऊ नये. ध्यानधारणा करावी.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world