जाहिरात

Empty Stomach Water Side Effects: सकाळी उठल्यानंतर पाणी कोणी पिऊ नये ? या माहितीकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

Empty Stomach Water Side Effects: सकाळी उठल्यानंतर पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञमंडळींकडून दिला जातो. पण रिकाम्या पोटी पाणी कोणी पिऊ नये आणि का? याबाबतही माहिती जाणून घेऊया...

Empty Stomach Water Side Effects: सकाळी उठल्यानंतर पाणी कोणी पिऊ नये ? या माहितीकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका
How To Drink Water: रिकाम्या पोटी पाणी कोणी पिऊ नये?

Empty Stomach Water Side Effects: आरोग्य निरोगी राहावे यासाठी आपल्या घरातील वडीलधाऱ्या मंडळींनी सांगितलेले नैसर्गिक उपचार पद्धती आजही तितकेच प्रभावी आहेत. पूर्वीच्या काळातील नैसर्गिक औषधोपचार पद्धतींचे वैज्ञानिक दृष्टिकोन सोप्या भाषेमध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम CPU-PSI सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिन, योग अँड संस्कार संस्थेचे संचालक प्रो. राम अवतार करत आहेत. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी किंवा दात न घासता पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. या सवयीमुळे आरोग्यास आश्चर्यकारक लाभ मिळतात, असेही म्हणतात. पण ही सवय खरंच सर्वांसाठी सुरक्षित ठरू शकते का? या प्रश्नाचे उत्तर देताना राम अवतार यांनी NDTVला सांगितले की, रिकाम्या पोटी पाणी पिण्यापूर्वी काही लोकांनी विशेष काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे. यामागील कारण जाणून घेऊया... 

रिकाम्या पोटी किंवा दात न घासता कोणी पाणी पिऊ नये? (Who Should Not Drink Water On an Empty Stomach?)

प्रो. राम अवतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एखादी व्यक्ती दात किंवा तोंडाच्या आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करत असेल तर त्यांनी रिकाम्या पोटी पाणी पिणे टाळावे. उदाहरणार्थ हिरड्यांचे आजार, तोंड येणे किंवा तोंडाचा कर्करोग असेल तर रिकाम्या पोटी पाणी पिणे टाळावे. या आजारांचा सामना करत असाल तर त्यावेळेस तोंडातील लाळेमध्ये हानिकारक घटक आणि संसर्ग वाढतात. अशा रुग्णांनी सकाळी उठल्यानंतर लगेचच पाणी प्यायले आणि पाण्यासोबत थेट लाळ गिळली तर हानिकारक घटक शरीरामध्ये प्रवेश करू शकतात, असे अवतार यांनी समजावून सांगितले. 

(नक्की वाचा: Jeera Water Benefits: वेटलॉससाठी रोज सकाळी प्या जिऱ्याचे पाणी, मिळतील 6 लाभ)

आजारांच्या स्थितीमध्ये काय करावे?

प्रो. राम अवतार यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, रिकाम्या पोटी पाणी प्यायचे असेल तर या लोकांनी सर्वप्रथम व्यवस्थित गुळण्या कराव्या. गुळण्या केल्यास तोंडातील जंतू आणि टॉक्सिन बाहेर फेकले जातील आणि पाणी पिणे सुरक्षित ठरेल. 

सामान्य परिस्थितीमध्ये लाळ गिळणे सुरक्षित ठरेल का?

निरोगी लोकांनी गुळण्या करुन पाणी फेकण्याऐवजी ते गिळणे सुरक्षित ठरू शकते. लाळेतील एंझाइम्समुळे पचनप्रक्रिया सुधारते आणि शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळेल, असेही प्रो अवतार म्हणाले. यामुळे अनावश्यकपणे लाळ थुंकणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. 

(नक्की वाचा: Chewing Neem Leaves Benefits: दात न घासता चघळून खा कडुलिंबाची पाने, 4 समस्या होतील समूळ नष्ट)

आरोग्यास फायदेशीर सवयी

प्रो. राम अवतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दैनंदिन जीवनातील  छोट्या-छोट्या सवयी तुमचे मोठ्या आजारांपासून संरक्षण करू शकतात. रिकाम्या पोटी पाणी पिणे आणि तोंडाचे आरोग्य निरोगी ठेवणे यामुळे तुमच्या संपूर्ण आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतील. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Listen to the latest songs, only on JioSaavn.com