जाहिरात

Jeera Water Benefits: वेटलॉससाठी रोज सकाळी प्या जिऱ्याचे पाणी, मिळतील 6 लाभ

Jeera Water Benefits: रोज सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे कोमट पाणी पिण्यास सुरुवात केली तर कित्येक सकारात्मक लाभ मिळतील.

Jeera Water Benefits: वेटलॉससाठी रोज सकाळी प्या जिऱ्याचे पाणी, मिळतील 6 लाभ
Jeera Water Benefits: जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे

Jeera Water Benefits For Weight Loss In Marathi: स्वयंपाकाची चव वाढवण्यासाठी जिऱ्याचा वापर आवर्जून केला जातो. पण जिऱ्याचे पाणी पिणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जिऱ्याचे कोमट पाणी प्यायल्यास कित्येक आजारांपासून शरीराचे संरक्षण होण्यास आणि आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल. जिऱ्यामध्ये फ्लेवोनॉइड्सचे गुणधर्म आहेत. जे शरीराचे फ्री रॅडिकल्स आणि हानिकारक तत्त्वांशी लढण्यास मदत करते. जिऱ्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म पुरेशा प्रमाणात आहेत, यामुळे शरीराला येणारी सूज कमी होण्यास मदत मिळते. नियमित जिऱ्याचे कोमट पाणी प्यायल्यास कोणकोणते फायदे मिळतील, जाणून घेऊया सविस्तर..

रोज सकाळी जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे | Jeera Water Benefits And Side Effects In Marathi| Rikamya Poti Jeera Water Pinyache Fayade| Cumin Water For Weight Loss

गरम मसाल्यातील जिऱ्यामुळे स्वयंपाकाची चव वाढते, शिवाय आरोग्यासही कित्येक लाभ मिळतात. नियमित जिऱ्याचे पाणी प्यायल्यास आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळू शकते. 

जिऱ्याचे फायदे | Jeera Benefits In Marathi 

जिऱ्यामध्ये अँटी-ऑक्सिंडट्स मोठ्या प्रमाणात आहेत आणि अन्नाचे चयापचय जलद होण्यास उपयोगी असणारेही गुणधर्म आहेत. यामुळे पचनप्रक्रियेशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात आणि शरीरावरील सूज देखील कमी होऊ शकते. जिऱ्याच्या पाण्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर फेकले जाण्यास मदत मिळेल आणि रक्तशर्करेची पातळी देखील नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल.

चयापचय जलदगतीने होण्यास मदत मिळेल 

जिऱ्याच्या कोमट पाण्यामुळे अन्नाचे चयापचय जलदगतीने होण्यास मदत मिळू शकते. अन्नाचे पचन सहजरित्या होऊ शकते. यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळेल. जिऱ्यातील अँटी-ऑक्सिडंट्स आणि अन्नाचे चयापचय जलद होण्यास उपयोगी असणाऱ्या गुणधर्मांमुळे शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते.   

निरोगी पचनप्रक्रिया

जिऱ्यातील पोषणतत्त्वांमुळे पचनाच्या समस्या दूर होण्यास आणि शरीरातील सूज कमी होण्यास मदत मिळू शकते. यातील घटक पचनाशी संबंधित एंजाइम्सचा प्रवाह वाढवण्यास आणि अन्नाचे योग्यरित्या पचन होण्यास मदत मिळेल. जिऱ्याचे पाणी नियमित प्यायल्यास अपचनाची समस्या दूर होऊन तुमची पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत मिळेल.

Weight Loss News: सुटलेले पोट काही दिवसांत होईल सपाट, 2 गोष्टी पाण्यात मिक्स करुन प्या; फॅट्स पटापट होतील बर्न

(नक्की वाचा: Weight Loss News: सुटलेले पोट काही दिवसांत होईल सपाट, 2 गोष्टी पाण्यात मिक्स करुन प्या; फॅट्स पटापट होतील बर्न)

डिटॉक्सिफिकेशन

जिऱ्याच्या पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जाण्यास मदत मिळेल. यामुळे यकृत आणि किडनी डिटॉक्स होईल. जिऱ्याचे पाणी शरीरासाठी डिटॉक्सिफायरच्या स्वरुपात कार्य करते आणि शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते. 

रक्तशर्करा नियंत्रणात राहण्यास मदत मिळते 

जिऱ्यातील गुणधर्मामुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल. जिऱ्याचे पाणी पिणे मधुमेहग्रस्तांसाठी फायदेशीर ठरेल.  

Weight Loss Tips: रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात या काळ्या बियांची पावडर मिक्स करुन प्या, मिळतील अद्भुत लाभ

(नक्की वाचा: Weight Loss Tips: रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात या काळ्या बियांची पावडर मिक्स करुन प्या, मिळतील अद्भुत लाभ)

अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म

जिऱ्यातील अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे शरीराच्या आतील अवयवांवर आलेली सूज कमी होण्यास मदत मिळेल. 

जिऱ्याचे पाणी नियमित पिण्याचे फायदे

  1. जिऱ्याचे कोमट पाणी प्यायल्यास आरोग्य निरोगी राहील.
  2. अनेक आजारांपासून शरीराचे संरक्षण होईल.
  3. नैसर्गिक उपचारामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होईल.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com