जाहिरात

OMG! 6 महिन्यांत 25 Kg वजन घटवले! जाणून घ्या 'या' महिलेचे वजन घटवण्याचे घरगुती राज

त्यामुळे कोणताही व्यायाम करण्या आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे हे कधी ही चांगले आहे.

OMG! 6 महिन्यांत 25 Kg वजन घटवले! जाणून घ्या 'या' महिलेचे वजन घटवण्याचे घरगुती राज

Weight loss tips: आजच्या धावपळीच्या जीवनात वजन वाढणे ही एक मोठी समस्या बनली आहे. मात्र, योग्य प्रयत्न आणि शिस्तबद्ध जीवनशैलीने हे आव्हान सहज पेलता येते. इन्फ्लूएन्सर साक्षी यादव हिने हे सिद्ध केले आहे. साक्षीने केवळ 6 महिन्यांत 25 Kg वजन कमी करून दाखवलं आहे. तिने विक्रमी वेळत वजन कमी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करून तिच्या या प्रवासातील काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत. शिवाय घरच्या घरी करता येण्यासारखे सोपे व्यायाम सांगितले आहेत. हे व्यायाम तुम्हालाही फायदेशीर ठरू शकतात असा तिचा दावा आहे. 

साक्षीने सांगितले की, महागड्या जीम उपकरणांशिवायही वजन कमी करणे शक्य आहे. तिने सुचवलेले व्यायाम अत्यंत मूलभूत आणि संपूर्ण शरीरासाठी उपयुक्त आहेत. सध्या अनेकांचा कल हा जीममध्ये जाण्याकडे असतो. तिथे गेल्यास वजन नक्की कमी होते असा ही काहींचा समज असतो. त्यासाठी महागड्या जीम लावल्याही जातात. पण त्या ऐवजी घरगुती जीमवर प्रयत्न केल्यास वजन कमी करता येते हे साक्षी यादव यांनी दाखवून दिलं आहे. त्यांनी त्यांचं तब्बल 25 किलो वजन कमी करून दाखवलं आहे.

नक्की वाचा - Urine problem: दिवसातून 8 पेक्षा जास्त वेळ लघवीला होतंय! मग 'या' आजाराची आहे भिती

 जंपिंग जैक्स (Jumping Jacks): 
हा व्यायाम संपूर्ण शरीराचा समन्वय साधतो. WebMD नुसार, योग्य आहारासोबत केल्यास फॅट कमी करण्यासाठी हा अत्यंत उपयुक्त आहे.

हाय नीज (High Knees): 
हा एक हाय-इंटेंसिटी कार्डियो व्यायाम आहे.  यामुळे हृदयाची गती वाढून मोठ्या प्रमाणात कॅलरी बर्न होतात आणि मेटाबॉलिज्म (चयापचय) सुधारतो.

जंपिंग स्क्वॅट्स (Jumping Squats): 
सामान्य स्क्वॅट्सपेक्षा हा व्यायाम अधिक प्रभावी आहे. स्क्वॅट करून वर उडी मारल्याने कॅलरी जलद गतीने बर्न होतात आणि अनेक स्नायू एकाच वेळी कार्यरत होतात.

त्वरित ऊर्जा देणारे व्यायाम
साक्षीने बर्पी जंप अप (Burpee Jump Up) आणि स्विच जंप (Switch Jump) यांसारख्या व्यायामांचाही तिच्या दिनचर्येत समावेश केला. बर्पी जंप अप हे कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग यांचे उत्कृष्ट मिश्रण आहे. जे मेटाबॉलिज्मला त्वरित गती देते. स्विच जंपमुळेही मोठ्या प्रमाणात कॅलरी बर्न होतात. मात्र, साक्षीने एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे तो म्हणजे कोणताही नवीन व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टर किंवा फिटनेस एक्सपर्टचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण प्रत्येक व्यक्तीचे शरीर आणि गरजा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे कोणताही व्यायाम करण्या आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे हे कधी ही चांगले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com