- मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
- मकरसंक्रांतीच्या दिवशी कठोर बोलणे टाळावे, असे ज्योतिषाचार्य श्रीकेतन कुलकर्णी यांनी सांगितलंय.
- मकरसंक्रांतीच्या दिवशी दुपारी 3.06 वाजता सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश
Makar Sankranti 2026 Date: हिंदू धर्मामध्ये सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा मकर संक्रांतीचा (Makar Sankranti 2026) उत्सव साजरा केला जातो. हा सण देशाच्या विविध भागांत वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो. मकरसंक्रांतीच्या या दिवशी गंगा स्नान, दान आणि सूर्यदेवांची उपासना करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. त्यामुळेच लोक या सणाची वर्षभर वाट पाहतात. मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व आणि नियम याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
मकर संक्रांती 2026 शुभ मुहूर्त | Makar Sankranti 2026 Shubh Muhurat
- 14 जानेवारी रोजी दुपारी 3.06 वाजता सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे.
- पंचांगानुसार 14 जानेवारी रोजी 3.06 वाजेपासून ते संध्याकाळी 06.19 वाजेपर्यंत पुण्यकाल असणार आहे.
- हा पुण्यकाळ महाशिवरात्रीप्रमाणे स्नान-दानासाठी अत्यंत उत्तम मानला जातो. महापुण्यकाळात केलेले गंगा स्नान आणि दान अनंत पटींनी फलदायी ठरते, अशी मान्यता आहे.
मकरसंक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे? ऐका संपूर्ण व्हिडीओ
मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे? | Makar Sankranti 2026 Dos List
- मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा नदीत किंवा इतर कोणत्याही पवित्र जलतीर्थावर स्नान करावे.
- जर जलतीर्थावर जाणे शक्य नसेल तर स्नानाच्या पाण्यात थोडे गंगाजल मिक्स करून गंगामातेचे स्मरण करत स्नान करावे.
- स्नानानंतर सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करून आदित्यहृदय स्तोत्र किंवा सूर्याष्टकाचे पठण करावे.
- मकरसंक्रांतीच्या दिवशी मंदिरातील पुजारी किंवा गरजू व्यक्तींना तिळापासून तयार केलेले पदार्थ आणि खिचडीचे विशेष स्वरुपात दान करावे.
(नक्की वाचा: Happy Makar Sankranti 2026 Wishes,Quotes: तिळगुळासारखा गोडवा तुमच्या जीवनात कायम राहो, मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!)
मकर संक्रांतीच्या दिवशी काय करू नये? | Makar Sankranti 2026 Don't List- मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि पूजन केल्याशिवाय अन्नग्रहण करू नये.
- मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे-वनस्पती तोडू नये.
- मकर संक्रांतीच्या दिवशी तामसिक पदार्थांचे सेवन करू नये.
- सूर्योदय झाल्यानंतर उशीरापर्यंत झोपणे टाळावे. तसेच या दिवशी दिवसा झोपू नये.
- मकर संक्रांतीच्या दिवशी एखादा गरजू व्यक्ती मदतीसाठी आली तर शक्यतो त्या व्यक्तीला रिकाम्या हाताने परत पाठवू नये.
(नक्की वाचा: Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीच्या दिवशी खिचडी का खाल्ली जाते? 99% लोकांना माहीत नाही हे महत्त्वाचं कारण)
Makar Sankranti 2026 FAQs | People Also Ask1. मकरसंक्रांतीची पौराणिक कथा काय आहे?उत्तर : संक्रांतीला देवता मानले गेल्याचे म्हणतात. संक्रांती देवीने संकरासुर दैत्याचा वध केला, अशी पौराणिक कथा आहे. संक्रांतीच्या दुसर्या दिवसाला किंक्रांत अथवा करिदिन असे म्हटले जाते. या दिवशी देवीने किंकरासुराला ठार मारले.
2. 14 की 15 जानेवारीला, मकर संक्रांती कधी आहे?
उत्तर : वर्ष 2026मध्ये मकरसंक्रांती 14 जानेवारीला साजरी करण्यात येणार आहे.
3. मकरसंक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे का परिधान करतात?
ज्योतिषाचार्य निनाद कुलकर्णी यांनी काळे कपडे परिधान करण्यासंदर्भातील माहिती व्हिडीओद्वारे शेअर केलीय, संपूर्ण व्हिडीओ ऐका...
4. संक्रांतीच्या दिवशी श्राद्ध घालता येतं का?
ज्योतिषाचार्य निनाद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संक्रांतीच्या दिवशी श्राद्ध आले तर नेहमीप्रमाणे श्राद्ध करता येईल.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

