- मार्गशीर्ष महिन्यातील दर्श अमावस्या 19 डिसेंबर 2025 रोजी आहे
- अमावस्या तिथीला पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी स्नान, दान, पूजन-तर्पण, पिंडदान यासारखे धार्मिक विधी पार पाडावे
- दर्श अमावस्येला गरजवंतांना दान करावे
Margashirsha Darsh Amavasya 2025 Date And Time: हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्याची अमावस्या तिथी दर्श अमावस्या (Darsh Amavasya 2025) म्हणून पाळली जाते. अमावस्या तिथीचे स्वामी पितर असतात. पौराणिक मान्यतेनुसार अमावस्या तिथीचे नाव अमावसु पितर यावरुन ठेवण्यात आलंय. पितरांप्रति आदर आणि आभार व्यक्त करण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाणारी यंदाच्या वर्षातील शेवटची दर्श अमावस्या कधी आहे, तिथी कालावधी काय आहे, पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कोणते उपाय करावे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
मार्गशीर्ष महिन्यातील दर्श अमावस्या तिथी | वर्ष 2025मधील शेवटची दर्श अमावस्या | Margashirsha Darsh Amavasya 2025 Date And Time
पंचागानुसार यंदाच्या वर्षातील शेवटची दर्श अमावस्या म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटची अमावस्या 19 डिसेंबर 2025 रोजी आहे.
- मार्गशीर्ष अमावस्या तिथी प्रारंभ वेळ : 19 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 4.59 वाजता आहे.
- मार्गशीर्ष अमावस्या तिथी समाप्त वेळ : 20 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.12 वाजता आहे.
अमावस्येच्या दिवशी पितरांशी संबंधित दोष दूर करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी स्नान-दान, पूजन, तर्पण आणि पिंडदान इत्यादी धार्मिक विधी करण्याची परंपरा आहे.
(नक्की वाचा: Mulank 1 Numerology 2026: करिअर आणि व्यवसायात काय बदल होतील? मुलांक 1साठी वर्ष 2026 कसं असेल, काय करावे उपाय?)

Photo Credit: Canva
दर्श अमावस्येचे उपाय | मार्गशीर्ष अमावस्या 2025 उपाय | Margashirsha Darsh Amavasya 2025 Upay
- मार्गशीर्ष महिन्यातील (Margashirsha Darsh Amavasya) अमावस्येच्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठावे. शक्य असल्यास जलतीर्थ म्हणजे गंगा-यमुना यासारख्या नदी किंवा पवित्र जलस्त्रोतामध्ये स्नान करावे. शक्य नसल्यास स्नानाच्या पाण्यामध्ये गंगाजल मिक्स करावे.
- मार्गशीर्ष महिन्यातील (Margashirsha Mahina) अमावस्येच्या दिवशी स्नानासह दान करण्याचेही अतिशय महत्त्व आहे. मान्यतेनुसार एखाद्या गरजवंताला दान केल्यास जीवन आणि कुंडलीशी संबंधित दोषांपासून मुक्तता मिळण्यास आणि पुण्यप्राप्ती होण्यास मदत मिळू शकते.
- अमावस्या तिथीला पितृपूजा करणं अतिशय फलदायी मानले जाते. पितरांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी स्नान दान करून दक्षिण दिशेला मुख करून श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान इत्यादी विधी पार पाडावे.
- अमावस्या तिथीला धनाची देवी लक्ष्मीमातेची पूजा आणि साधना करणं अतिशय शुभ तसेच फलदायी मानले जाते. अमावस्येच्या दिवशी आपल्या घराची स्वच्छता करून संध्याकाळच्या वेळेस दारासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करावा आणि पूजा करताना लक्ष्मीमातेच्या मंत्राचा जप करावा.
- देवीदेवतांइतकेच पूजनीय मानल्या जाणाऱ्या पिंपळाच्या झाडाचीही अमावस्येच्या दिवशी पूजा करण्याची परंपरा आहे. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करावा, पिंपळाच्या झाडामध्ये त्रिदेव म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवतांचा निवास असतो, असे म्हणतात. त्याचप्रमाणे घराच्या दक्षिण दिशेला यम देवतेसाठीही दिवा प्रज्वलित करावा.
(नक्की वाचा: New Year 2026 Good Luck Tips: वर्ष 2026मध्ये आयुष्यात सुखसमृद्धीचा वर्षाव होईल, अडचणी होतील दूर; करा हे 9 उपाय)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world