जाहिरात

How To Calm Your Mind: मन सतत धावतंय, शांत होत नाहीय? करा हे 8 सोपे उपाय

How To Calm Your Mind: अस्थिर मनाला कसे शांत करावे? जाणून घ्या डॉक्टर रुचा पै यांनी दिलेली महत्त्वाची माहिती...

How To Calm Your Mind: मन सतत धावतंय, शांत होत नाहीय? करा हे 8 सोपे उपाय
"How To Calm Your Mind: मन शांत करण्यासाठी 8 उपाय"
Canva

How To Calm Your Mind: मन शांत होत नाही, सतत अस्थिर वाटतं, छोट्या-छोट्या गोष्टींचा ताण जाणवतो, अशी बहुतांश लोकांची तक्रार असते. भरकटलेलं मन स्थिर करण्यासाठी लोक ध्यानधारणेसह विविध उपाय करतात. पण इतके उपाय करूनही मनाला शांतता मिळत नाही. डॉ. रुचा पै यांनी सोशल मीडियावर मन शांत करण्यासाठी सांगितलेले आठ उपाय सविस्तर जाणून घेऊया...

मन शांत करण्यासाठी 8 उपाय | How To Calm Your Mind | Mental Health Tips

उपाय 1: दीर्घ श्वास (Instant Calm)

4-4-6 Breathing Technique:
4 सेकंद श्वास घ्या 4 सेकंद थांबा आणि 6 सेकंद श्वास सोडा
मज्जासंस्था लगेच शांत होते मन धावपळीतून स्थिरतेकडे जाते.

उपाय 2: पित्त शांत करा (Ayurveda)

मन अस्थिर होण्याचे मोठं कारण = पित्त वाढणं
सकाळी कोमट पाण्यात 2 थेंब तूप मिक्स करा.
जास्त चहा-कॉफी पिणे टाळा
कपाळाला थंड पाण्याचा हलका शेक द्यावा
मनाचा ताप शांत होतो.

उपाय 3: 'STOP Technique'

नकारात्मक विचार सुरू झाले की मनात ठामपणे थांब असं म्हणा. 
यामुळे विचारांना ताबडतोब ब्रेक लागेल.
नंतर एक सकारात्मक वाक्य म्हणा की, "मी ठीक आहे.” "हेही निघून जाईल.” "मी सुरक्षित आहे.”

उपाय 4: भ्रामरी प्राणायम 

नाकातून दीर्घ श्वास घ्या ओठ बंद ठेवा "म्म्म..." असा वायब्रेशन झाल्यास ते मेंदूमध्ये सेरोटोनिन हार्मोन वाढवते. 
यामळे चिंता, नैराश्य आणि अतिविचार यासारख्या समस्या कमी होतात. 

उपाय 5: पुरेशी झोप

झोप नीट नाही तर मन कधीही शांत राहत नाही.
रात्रीच्या वेळेस मोबाइल लॅपटॉपचा वापर कमी करावा. 
पाय गरम पाण्याने धुवावे. बेडवर जाताना दीर्घ श्वास घ्यावा. 
याद्वारे मनाला शरीराला आराम मिळतो. 

उपाय 6: एका वेळेस एकच काम करा 

एका वेळेस अनेक कामं केली तर मनावर ताण येईल. 
त्यामुळे एका वेळेस एकच काम करा. 

Reels Side Effects: आणखी एक Reel आणि सर्वच संपलं! तुमचा मेंदू होतोय गुलाम, क्षणभराचा आनंद ठरेल प्रचंड घातक

(नक्की वाचा: Reels Side Effects: आणखी एक Reel आणि सर्वच संपलं! तुमचा मेंदू होतोय गुलाम, क्षणभराचा आनंद ठरेल प्रचंड घातक)

उपाय 7:  दिशा द्या- मन आपोआप शांत होतं

मनाला योग्य दिशा द्या. 
मन भटकतं कारण दिशा नसते.
दररोज 3 ओळी लिहाः
1. आजचा त्रास
2. मी काय नियंत्रित करू शकते/शकतो
3. एका छोट्या सकारात्मक निर्णयामुळे मनाला लगेचच स्पष्टता मिळू शकते. 

Amaranth Benefits: सुपरफुड राजगिरा खाल्ल्यास वजन कमी होईल का? कसे करावे सेवन, डॉक्टरांनी दिली मोठी माहिती

(नक्की वाचा: Amaranth Benefits: सुपरफुड राजगिरा खाल्ल्यास वजन कमी होईल का? कसे करावे सेवन, डॉक्टरांनी दिली मोठी माहिती)

उपाय 8: 30 मिनिटे स्क्रीनपासून दूर राहा 

30 मिनिटे मोबाइल /लॅपटॉप स्क्रीनपासून दूर राहा 
रील्स, नोटिफिकेशन, तीव्र प्रकाश यामुळं मनाला अतिउत्तेजना मिळते
नियमित 30 मिनिटे नो स्क्रीनचा नियम पाळा, यामुळे मनाला शांतता मिळेल. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com