जाहिरात

Weight Loss Tips: न्युट्रिशनिस्टने 4 महिन्यात घटवले तब्बल 25 किलोग्रॅम वजन, फॅट्स कमी करण्यासाठी सांगितले 4 उपाय

Weight Loss Tips: न्युट्रिशनिस्टने केवळ चार महिन्यांमध्ये स्वतःचे तब्बल 25 किलोग्रॅम वजन कमी केले. इतक्या कमी कालावधीत तिने वजन कसे घटवले? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Weight Loss Tips: न्युट्रिशनिस्टने 4 महिन्यात घटवले तब्बल 25 किलोग्रॅम वजन, फॅट्स कमी करण्यासाठी सांगितले 4 उपाय
"Weight Loss Tips: वेटलॉससाठी चार सोपे उपाय"

Weight Loss Tips : लठ्ठपणा हा आजच्या काळातील एक गंभीर आजार आहे, ज्यामुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कित्येक लोक त्रासले आहेत. वजन वाढण्यामागील कारणे अनेक असू शकतात. पण वजन वाढीच्या समस्येवर वेळीच उपाय केले नाहीत तर याहून जीवघेण्या रोगांची लागण होऊ शकते. मधुमेह, थायरॉइड आणि हृदयरोगाचे मुख्य कारण लठ्ठपणा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी लठ्ठपणावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. तुम्ही देखील शरीरामध्ये जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी मार्ग शोधत आहात का? तर या लेखातील माहिती तुमच्याकरिता उपयुक्त ठरू शकते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सर्टिफाइड न्युट्रिशनिस्ट अमाकाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर वजन कमी करण्यासाठीची खास पद्धत शेअर केलीय आहे. अमाकाने व्हिडीओद्वारे सांगितले की, तिने केवळ चार महिन्यांमध्ये महिन्यांत 25 किलोग्रॅम वजन कमी केलंय. विशेष म्हणजे वेटलॉस करण्यासाठी तिने कोणत्याही प्रकारच्या महागड्या सप्लिमेंटचा वापर केलेला नाही. तिने फक्त चार साध्या-सोप्या नियमांचे पालन करून शरीरातील अतिरिक्त चरबी घटवलीय. चला जाणून घेऊया न्युट्रिशनिस्टने सांगितलेल्या वजन कमी करण्यासाठीच्या चार खास पद्धती... 

न्युट्रिशनिस्टने चार पद्धतींद्वारे चार महिन्यांमध्ये घटवले 25 किलोग्रॅम वजन :

स्टेप नंबर 1: इंटरमिटेंट फास्टिंग आणि डिटॉक्सिंग

न्युट्रिशनिस्टने पोस्टमध्ये सांगितलंय की, वजन कमी करण्यासाठी तिने सर्वप्रथम इंटरमिटेंट फास्टिंग आणि डिटॉक्सिंग या पर्यायाची मदत घेतली. दुपारी 12 वाजता डाएट फॉलो केल्यानंतर तिनं आठ तास कोणतेही पदार्थ खाणे टाळले. फास्टिंग केल्यानं शरीराला कॅलरीजचा पुरवठा झाला नाही, यामुळे शरीरातील अतिरिक्त फॅट्स बर्न होऊ लागले. 

डिटॉक्सिंगसाठी न्युट्रिशनिस्ट सकाळी कोमट पाण्यातून लिंबू पाणी, ग्रीन टी, डिटॉक्स स्मूदी आणि जास्त प्रमाणात पाणी पित असे. यामुळे शरीरातील जळजळ कमी होते, पचनप्रक्रिया सुधारते आणि चरबी कमी होण्यासही मदत मिळते. 

स्टेप नंबर 2: टार्गेट सेट करणे

न्युट्रिशनिस्ट प्रत्येक आठवड्यामध्ये नवीन टार्गेट सेट केले होते. उदाहरणार्थ नियमित तीन लिटर पाणी पिणे,  साखर न खाणे, नियमित 30 मिनिटे व्यायाम करणे आणि नियमित 10 हजार पावले चालणे. हे छोटे छोटे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी तिला प्रेरणा मिळत गेली आणि वजन कमी होण्यासही मदत मिळाली. 

स्टेप नंबर 3 : व्यायाम 

वजन कमी करण्यासाठी न्युट्रिशनिस्टने तिच्या डेली रुटीनमध्ये कार्डियो एक्सरसाइजसह स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि चालण्याच्या व्यायामाचा समावेश केला. वेट लिफ्टिंग, पुश-अप्स, स्क्वॉट्स यासारख्या व्यायामामुळे तिच्या शरीराची चयापचयाची क्षमता सुधारली. नियमित 10,000 पावले चालण्याने शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न होण्यास मदत मिळाली, यामुळे हृदयाच्या आरोग्यामध्ये सुधारणा होऊ लागली. 

आतड्यांमध्ये 5 कारणांमुळे जमा होते घाण आणि पचनप्रक्रिया बिघडते, जाणून घ्या आतड्यांच्या स्वच्छतेसाठी प्रभावी उपाय

(नक्की वाचा: आतड्यांमध्ये 5 कारणांमुळे जमा होते घाण आणि पचनप्रक्रिया बिघडते, जाणून घ्या आतड्यांच्या स्वच्छतेसाठी प्रभावी उपाय)

स्टेप नंबर 4 : प्रोटीनयुक्त आहार 

महत्त्वाचे म्हणजे न्युट्रिशनिस्टने तिच्या डाएटमध्ये प्रोटीनचे प्रमाण वाढवले. अंडी, चिकन, मासे, डाळी, ग्रीक योगर्ट, टोफू आणि सुकामेवा यासारख्या पदार्थांचा तिने आहारामध्ये समावेश केला.  

अशा चार साध्या सोप्या टिप्स फॉलो करुन न्युट्रिशनिस्टने शरीराचे वजन घटवलेच शिवाय निरोगी जीवनशैली देखील अवलंबली. तुम्ही देखील या गोष्टी फॉलो करुन तुमचे शरीर निरोगी ठेवू शकता.

पोट स्वच्छ होत नाही? दह्यात ही गोष्ट मिक्स करुन खा, आतड्यांच्या प्रत्येक कोपऱ्यातून घाण येईल बाहेर

(नक्की वाचा: पोट स्वच्छ होत नाही? दह्यात ही गोष्ट मिक्स करुन खा, आतड्यांच्या प्रत्येक कोपऱ्यातून घाण येईल बाहेर)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: