सध्या राज्यात कडक उन्हाळ्याचे चटके बसू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागात उष्णतेची लाट सुरु आहे. तापमानाचे अंक चाळीशी पार करत आहेत. तापमानात होणाऱ्या सतत वाढीमुळे नागरिकांना कडक उन्हाच्या तडाख्याचा सामना करावा लागत आहे. वाढत्या ऊनाचा परिणाम मानवी आरोग्यावर होऊ लागला आहे. महाराष्ट्रात बुलडाणा, सिंधुदुर्ग, वर्धा, धुळे, नाशिक, पुणे, कोल्हापूरसह विविध भागांत तापमानात तीव्र वाढ झाल्याने उष्माघाताच्या 82 घटना समोर आल्या आहेत.
उष्णतेची लाट कायम राहणार तर काही ठिकाणी मुसळधार
राज्यात 1 मार्च ते 16 एप्रिल 2024 दरम्यान उष्माघाताचे एकूण 82 रुग्णांची नोंद झाली आहे. वर्धामधून 8, चंद्रपूरमधून 2, नागपूरमध्ये 1, भंडारा जिल्ह्यात 1, गोंदिया जिल्ह्यात 1 अशा एकूण 13 रुग्णांची नोंद झाली आहे. लहान मुले, गर्भवती महिला आणि वृद्धांना उष्माघाताचा धोका अधिक असतो. उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी, शरीरातले पाणी कमी होऊ न देण्याची प्राधान्याने काळजी घ्यावी. दुपारच्या वेळी बाहेर जाणे टाळावे, बाहेर जाण्याची वेळ आलीच तर बाहेर जाताना सैल सुती कपडे वापरावे, चष्मा वापरावा, पाण्याची बोटल सोबत ठेवावी इत्यादी.
उष्णतेची लाट, वाढता उकाडा आणि पाण्याच्या अभावामुळे मानसिक आरोग्य धोक्यात?
उष्माघाताची लक्षणे काय आहेत?
थकवा, ग्लानी, भूल, लक्ष न लागणे, स्मृतिभ्रंश, परिस्थितीचे आकलन न होणे ही उष्माघाताची काही लक्षणे आहेत. या लक्षणांसोबतच डोकेदुखी, मळमळणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि हृदयाचे ठोके वाढणे किंवा स्नायूंमध्ये वेदना होण्यासारखी इतर गंभीर लक्षणेही दिसू लागतात.