
दिवाळीच्या लक्ष्मीपूजनानंतर अमरावती शहरातील काली माता मंदिरात गेल्या 41 वर्षांपासून चालत आलेल्या एका अनोख्या परंपरेमुळे भाविकांची मोठी गर्दी जमते आहे. या मंदिरात देवीच्या प्रसादासोबत लाडू, लाह्या, मिठाई आणि चक्क 'पैशांचा प्रसाद' दिला जातो, ज्यामुळे हे मंदिर श्रद्धेचे आणि आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
पैशांच्या वाटपाची अनोखी परंपरा
दिवाळी हा सण धन, वैभव आणि समृद्धीची देवता असलेल्या महालक्ष्मीच्या पूजनासाठी विशेष मानला जातो. या दिवशी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि समृद्धीसाठी भाविक विविध मंदिरांमध्ये जातात. अमरावती शहरातील स्मशानभूमी परिसरात असलेले काली माता मंदिर अशाच एका विशेष परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. इथे केवळ मिठाई किंवा फळांचा प्रसाद नाही, तर लाह्या, मिठाई आणि सोबत पैशांचा प्रसादही दिला जातो.
(नक्की वाचा- Pune News: 'पुणेकर विरुद्ध बाहेरचे' आमने-सामने! "चालले, परत येऊ नका" पोस्टरला तरुणाचं सडेतोड उत्तर)
यावर्षीही लक्ष्मीपूजनानंतर लगेचच या विशेष प्रसाद वाटपाला सुरुवात झाली. हा अनोखा प्रसाद मिळवण्यासाठी शेकडो भाविकांनी मंदिराबाहेर लांबच लांब रांगा लावल्या होत्या. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन रात्री उशिरापर्यंत प्रसादाचे वाटप सुरू ठेवण्यात आले.
प्रसादासाठी हजारोंची गर्दी
1984 पासून अखंड परंपरा मंदिराचे पुजारी शक्ती महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अनोख्या प्रसादाच्या वाटपाची परंपरा 1984 साली सुरू झाली. मागील 41 वर्षांपासून ही प्रथा अविरतपणे सुरू आहे आणि दरवर्षी भाविकांची गर्दी वाढतच आहे. मंदिरातून मिळालेले हे पैसे जर भाविकांनी आपल्या घर, दुकान किंवा तिजोरीमध्ये ठेवले, तर त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते. या श्रद्धेमुळेच दरवर्षी हजारो लोक या प्रसादासाठी येतात.
(नक्की वाचा- Vande Bharat Train: कोकणात जाणाऱ्यांसाठी खूशखबर! 'वंदे भारत'च्या फेऱ्या वाढल्या, पाहा नवीन वेळापत्रक)
शक्ती महाराजांच्या म्हणण्यानुसार, “पैसा हा तिजोरीत बंद न ठेवता तो समाजात फिरता राहिला पाहिजे. जेव्हा पैसा समाजात फिरतो, तेव्हा आर्थिक चक्र सुरळीत चालते आणि यामुळे समाजाची आणि पर्यायाने देशाचीही उन्नती होते. यामुळे अमरावतीचे हे काली मातेचे मंदिर दिवाळीच्या काळात भाविकांसाठी एक खास ठिकाण ठरले आहे. भाविक मोठ्या श्रद्धेने हा 'बरकत' असलेला पैशाचा प्रसाद स्वीकारून आपल्या जीवनात समृद्धी आणि भरभराट येवो यासाठी प्रार्थना करतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world