
स्वानंद पाटील, बीड: बीडच्या अर्धमसला गावातील मस्जिदमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास जिलेटीन च्या सहायाने स्फोट करण्यात आला. यात मस्जिद मधील फरशी फुटल्या तर भिंतीना देखील भेगा पडल्या आहेत. गावातीलच दोन तरुणांनी हा स्फोट घडवून आणल्याचे समोर आले आहे. या दोन्ही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता या प्रकरणात धक्कादायक अपडेट समोर आली आहे.
Fraud News: 'लाडकी बहीण'नंतर लाडकी लेक... आमिष दाखवून महिलेला हजारोंचा गंडा, प्रकरण काय?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला या गावात मस्जिद मध्ये स्फोट झाल्याची घटना घडली. याप्रकरणी गावातीलच दोन तरुणांना अटकही करण्यात आली आहे. याप्रकरणात आता एक धक्कादायक बाब समोर आली असून आरोपींनी स्फोट करण्याआधी रिल्स बनवल्याचेही समोर आले आहे.
यातील आरोपी विजय गव्हाणे याने हा स्फोट घडवून आणण्यापूर्वी चक्क इंस्टाग्राम वर रील बनवले असल्याचे समोर आले आहे. शिस्तीत रहा बेट्या मी अंगार भंगार नाय रे.. या गाण्यावर तरुणाने रिल्स बनवले. यावेळी त्याने हातात जिलेटीनच्या कांड्या आणि तोंडात सिगारेट घेऊन व्हिडिओ शूट करत असल्याचे दिसत आहे. याचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Fraud News: 'लाडकी बहीण'नंतर लाडकी लेक... आमिष दाखवून महिलेला हजारोंचा गंडा, प्रकरण काय?
दरम्यान, बीडमध्ये झालेल्या या प्रकरणावरुन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बीड येथील अर्धमसला गावातील मशिदीत स्फोट कोणी घडवला हे सरकारला कळलं आहे. लवकरात या संदर्भात खुलासा केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. या प्रकरणातील आरोपींची नावे आणि संपूर्ण माहिती हे बीडचे पोलीस अधीक्षक लवकरच जाहीर करणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world