
राहुल कुलकर्णी, बीड: वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी बीड जिल्हा पोलीस दलाने एक ऐतिहासिक आणि निर्णायक पाऊल उचलले आहे. जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी दिलेल्या आदेशानुसार, पोलीस काॅन्स्टेबल ते ग्रेड पोलिस उपनिरीक्षक अशा एकूण 606 पोलिस अंमलदारांची बदली करण्यात आली आहे. हे आतापर्यंतचे बीड जिल्ह्यातील सर्वाधिक बदल्यांचे प्रमाण असून, यामुळे संपूर्ण जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेमध्ये एक नवचैतन्य निर्माण होणार असल्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा: Cannes 2025: बनारसी साडी आणि सिंदूर, ऐश्वर्या रायकडून घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम)
बीडच्या पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले असून बीड जिल्ह्यात 600 पेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बीड जिल्ह्यातील एकूण 606 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 आणि त्याच्या 2015 च्या सुधारणा अंतर्गत करण्यात आल्यात.
1. सलग किंवा मधूनमधून 5 वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेले (229 कर्मचारी)
2. एकाच तालुक्यात 12 वर्षांपेक्षा जास्त सेवा पूर्ण केलेले (216 कर्मचारी)
3. मूळ तालुक्यात पोस्टिंग असलेले कर्मचारी (161 कर्मचारी)
(नक्की वाचा: विशाल निकमच्या खऱ्या आयुष्यातील मिस फायर आहे ही अभिनेत्री? त्या कमेंटची होतेय चर्चा)
बदली प्रक्रिया राबवण्यासाठी जिल्हास्तरीय स्थापत्य मंडळ स्थापन करण्यात आले होते. वार्षिक बदल्यांचा आढावा घेण्यासाठी 27 मार्च रोजी बैठक झाली. सरकारच्या 23 एप्रिल 2010 च्या निर्णयानुसार बदल्या करण्यात आल्या. सर्व पात्र कर्मचाऱ्यांना बदल्यांसाठी अर्ज करण्यास सांगण्यात आले. 14 ते 16 मे दरम्यान, पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रत्यक्ष सल्लामसलत सत्र घेण्यात आले, जिथे वैयक्तिक प्रकरणांचे ऐकून निर्णय घेण्यात आला.
606 कर्मचाऱ्यांपैकी 363 जण बीड तालुक्यांतर्गत बदल्यांसाठी पात्र होते. सर्व कर्मचाऱ्यांना एकाच वेळी हलविल्यास मनुष्यबळाची कमतरता भासू शकते, हे लक्षात घेऊन काही प्रकरणांमध्ये अटी शिथिल करण्यात आल्यात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world