
आकाश सावंत, बीड: बीडच्या गढी परिसरात सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात भरधाव कंटेनरने चिरडल्याने गेवराईमधील सहा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या भयंकर अपघातने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या अपघाताचा आता सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. ज्यामध्ये सुसाट ट्रक या तरुणांना चिरडून निघून गेल्याचे दिसत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, बीडच्या गढी परिसरात सोमवारी रात्री उशिरा घडलेल्या भीषण अपघातात गेवराई येथील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. घटना गढी येथील छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ घडली. गेवराई शहरातील काही नागरिकांची चारचाकी गाडी गढी परिसरात तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली होती. त्यामुळे हे सहा जण गाडी आणण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते.
तेव्हा भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने थेट त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत सर्व सहाजणांचा जागीच मृत्यू झाला. अपघात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुणांची गाडी रस्त्याकडेला उभी आहे. त्याचवेळी एक भरधाव वेगातील कंटेनर त्यांच्या गाडीला येऊन धडकतो, तरुणांना चिरडून निघून जातो.
नक्की वाचा - भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बस करार रद्द करा, परिवहन मंत्र्यांना असे आदेश का दिले?
हा अपघात इतका भीषण होता की तरुण अक्षरशः हवेत उडाले आणि गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. भीषण अपघातानंतर सर्वांचे मृतदेह रस्त्यावर पडले होते. हे चित्र पाहून घटनास्थळी असलेल्यांचेही डोळे पाणावले. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले असून अपघातग्रस्त कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
बीडमधील अपघाताचा भीषण Video...
— Gangappa Pujari (@GangappaPujar07) May 27, 2025
सहा जणांचा करूण अंत...#Beed #Accient #Viralcctv pic.twitter.com/11mLpT9PBE
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world