
राकेश गुडेकर, रत्नागिरी: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. विशेषतः शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव आणि शिंदे शिवसेनेचे नेते रामदास कदम व त्यांचे पुत्र मंत्री योगेश कदम यांच्यात संघर्ष पेटला आहे. एकमेकांच्या मतदारसंघात आव्हान- प्रति आव्हान देणं सुरू आहे.. त्यातच भास्कर जाधव यांनी थेट योगेश कदमांच्या विरोधात उमेदवारच जाहीर करून टाकला आहे.
रामदास कदम... भास्कर जाधव.. दोघेही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत घडलेले शिवसैनिक.. दोघेही आक्रमक.. भाषणांमधून दोघेही कोणालाही अंगावर घेणारे... मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर या दोघांमधला संघर्ष वाढला आहे.. एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत.. त्यातच रामदास कदमांचे चिरंजीव राज्यमंत्री योगेश कदम यांनीही 2009 मध्ये गुहागर मतदारसंघात वडिलांच्या झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी रणनीती आखत भास्कर जाधव यांना डीवचलं आहे. निमित्त होतं गुहागर मतदारसंघात असलेल्या खेडच्या खाडीपट्ट्यातील अनेकांचा शिवसेनेतील प्रवेश.
पुण्यात आणखी 3 महानगरपालिका? DCM अजित पवारांची मोठी घोषणा
याच कार्यक्रमात रामदास कदमांनीही भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला. विधानसभा निवडणुकीत माझ्या 2 ते 3 सभा झाल्या असत्या, तर 20 हजार मतांनी भास्कर जाधव पडला असता.. असा थेट वार कदमांनी केला. कदम पिता पुत्रांचा वार जिव्हारी लागलेल्या भास्कर जाधव यांनी गुहागरच्या सभेत थेट योगेश कदमांच्या विरोधात उमेदवारच जाहीर करून टाकला.. 2019 मध्ये भास्कर जाधव यांच्या विरोधात लढलेले पण सध्या शिवसेना उबाठाचे जिल्हा संपर्कप्रमुख असलेल्या सहदेव बेटकर यांना तयारीला लागण्याचे आदेश त्यांनी दिले.. जाधव यांनी बेटकरांना "जाऊन योगेश कदमच्या उरावरच बसा," असं म्हणत थेट योगेश कदम यांना लक्ष्य केलं..
याच सभेत भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावरही जोरदार शाब्दिक प्रहार करत, रामदास कदम यांना बामदास छमछम हे नवं नाव दिलं.. तसेच मी कधीही रामदास कदम यांच्या पाया पडलो नाही, पण रामदास कदम माझ्या दोन वेळा पाया वेळा पाया पडल्याचं सांगत जाधवांनी रामदास कदमांना आव्हान दिलं आणि कदमांचे वाभाडेच काढले..
Solapur Crime: गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचे अपहरण, हत्येचा प्रयत्न, राजकीय वर्तुळात खळबळ
एकूणच योगेश कदम यांनी गुहागर मतदारसंघात घातलेलं लक्ष.. तसेच भास्कर जाधव यांनी योगेश कदमांच्या विरोधात थेट उमेदवार जाहीर करत रामदास कदमांवर केलेली वैयक्तिक टीका, यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये आगामी काळात संघर्ष पेटणार एवढं मात्र नक्की.. पण दापोली आणि गुहागर मतदारसंघांच्या राजकारणातून सुरू झालेला हा संघर्ष आता संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणावर किती परिणाम करतो हे पाहणं महत्त्वाचं आहे...
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world