गुरुप्रसाद दळवी/राकेश गुडेकर
शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या रवींद्र कदम यांच्याविरोधातील वक्तव्यामुळे भाजप आक्रमक झाली आहे. यापुढे त्यांनी कोणतीही टीका केल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटतील. रामदास कदम यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल. रामदास कदमांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी दिला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तर भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी देखील रामदास कदम यांच्यावर टोकाची टीका केली. रामदास कदम यांना वृद्धाश्रमात जाण्याची वेळ आली आहे. वृद्धाश्रमात अखेरचे दिवस आनंदात काढा. महायुतीत मिठाचा खडा टाकू नका, असं बाळ माने यांनी म्हटलं.
बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीत मुंबई-गोवा महामार्गावर निदर्शने करण्यात आली. रामदास कदम यांच्याविरोधात भाजपने जोडे मारो आंदोलन देखील केलं. रामदास कदम यांच्या पुतळ्याला जोडे मारत पुतळा जाळून भाजपकडून रामदास कदम यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला.
(नक्की वाचा- रामदास कदमांची रविंद्र चव्हाणांविरोधात थेट मोदी-शाहांकडे तक्रार, लेटर बॉम्बमुळे मुहायुतीला हादरे?)
...तर शिंदेंच्या आमदारांना घरी बसवू
सावंतवाडी भाजप कार्यालयासमोर रामदास कदमांचा पुतळा जाळण्यात आला. रामदास कदम यांनी रविंद्र चव्हाण यांची त्यांनी पाय धरून माफी मागावी. त्यांच मन मोठं आहे ते माफ करतील. मात्र जर भाजपचा कार्यकर्ता पेटला तर दीपक केसरकरांसह शिंदेंच्या आमदारांना घरी बसल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा देखील भाजपने दिला, असा इशारा माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी दिला.
(नक्की वाचा- हे कुठल्या युतीधर्मात बसतं? रामदास कदमांच्या वक्तव्यावर फडणवीसांचा संताप )
महायुतीत शिवसेनेसोबत बसणार नाही
यावेळी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जर यापुढे रविंद्र चव्हाण यांच्याबद्दल बोलाल तर खपवून घेणार नाही. चपलांचा हार घरी पाठवू, मोर्चा काढू. जोपर्यंत रामदास कदम माफी मागत नाही तोवर महायुतीत शिवसेनेसोबत बसणार नाही. आगामी निवडणुकांत सहकार्य करणार नाही, बहिष्कार घालू असा इशारा माजी सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world