
अमरावती: 'सर्वसामान्य जनता जातीयवादी नाही, पुढारी जातीयवादी आहेत ते आपल्या स्वार्थाकरिता जात निर्माण करतात...', असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. अमरावतीमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. एकीकडे राज्यात धार्मिक हिंसाचार उफाळला असतानाच गडकरींनी केलेल्या या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
अमरावतीमध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे डॉ.पंजाबराव देशमुख पुरस्कार वितरण सोहळा गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडला. तसेच श्री संत अच्युत महाराज हृदयरोग रुग्णालयातील नवीन कॅथलॅबचे उद्घाटन नितीन गडकरींनी केले. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी राजकीय पुढाऱ्यांचाच समाचार घेतला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले नितीन गडकरी?
"काळाच्या ओघामध्ये ज्ञान ही सर्वात मोठी शक्ती आहे. ज्ञान ही सर्वात मोठी शक्ती आहे. ती केवळ शिक्षणात किंवा तंत्रज्ञानात नाही तर ग्रामीण विकासामध्ये, शेतीमध्येही आहे. जे जे चांगले असेल त्याला मदत केली पाहिजे, अशा प्रकारची संवेदनशिलता ही कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांकडे असणे गरजेचे आहे. राजकारण म्हणजे केवळ पाच वर्षांची निवडणूक नाही. आता प्रत्येकाला तिकीट पाहिजे. एवढा खर्च फोटो लावायला, सत्कार करायला होतो," असं नितीन गडकरी म्हणाले.
"माझी मुले राजकारणात नाहीत. माझा मुलगा म्हणून त्याला राजकारणात स्थान मिळेल असे नाही. त्याला कर्तृत्वाने राजकारणात आला तर नक्की घ्या. आमदाराच्या पोटातून आमदार नाही झाला पाहिजे, खासदाराच्या पोटातून खासदार नाही झाला पाहिजे. त्यांच्या कर्तृत्वाने ते जनतेने म्हणले पाहिजे," असेही नितीन गडकरी म्हणाले.
(नक्की वाचा- Crime News : प्रशांत कोरटकर दुबईत की तपास भरकटवण्याचा प्रयत्न? जुन्या इन्स्टा पोस्टमुळे संशय बळावला)
"राजकारणाचा अर्थ समाजकारण आहे, राष्ट्रकारण विकासकारण आहे. पोस्टर, बॅनर लावून काही होत नाही हे सगळे क्षणिक आहे. जनतेच्या मनात तुमचे जे स्थान असेल ते सगळ्यात मोठ आहे. जनतेचे जीवनमान बदलणे खूप महत्त्वाचे आहे. जात पुढारी निर्माण करतात. सर्वसामान्य जनता जातीयवादी नाही, पुढारी जातीयवादी आहेत ते आपल्या स्वार्थाकरिता जात निर्माण करतात," असे नितीन गडकरी म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world