
योगेश लाटकर, नांदेड
Nanded News : भाजप आमदाराने जिल्हा उपनिबंधक यांना शिवीगाळ करत धमकावल्याचं प्रकरण समोर आलं आहे. आमदाराने शिवीगाळ केल्याची ऑडिओ केली सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील ही घटना आहे.
नरसी सोसायटीच्या जिल्हा उपनिबंधकांना भाजपा आमदार राजेश पवार यांनी फोनवरून शिवीगाळ केली. मुखेडचे आमदार तुषार राठोड यांनी फोन करुन उपनिबंधक यांना मुखेड येथील रिक्त जागा मला विचारल्याशिवाय भरायची नाही. त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. तसेच माझ्या मतदारसंघात मला विचारल्याशिवाय कुठली नियुक्ती करायची नाही, असं आमदार तुषार राठोड म्हणाले.
(नक्की वाचा- Satara News: आली लहर केला कहर! नव्या गाडीचं सेलिब्रेशन, थेट महामार्गच रोखला, मग पुढे...)
त्यानंतर त्यांनी आमदार राजेश पवार यांना फोन दिला. नायगाव मतदारसंघाचे भाजपाचे आमदार राजेश पवार यांनी जिल्हा उपनिबंधक यांना शिवराळ केली. ऑडिओ क्लीप व्हायरल करायची तर कर. तुमच्यात एवढी डेरिंग कुठून आली. आमदारांना विचारत नाही. तुम्ही हे लाचेचे पैसे कुठं घेऊन जाणार, अशी विचारण करत राजेश पवार यांनी शिवीगाळ केली.
मात्र राजेश पवार यांनी आता हा आवाज आपला नसल्याचा दावा केला आहे. तसेच याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे.
काय आहे प्रकरण?
नरसी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक झाली होती. त्यात आमदार समर्थक गावकरी पॅनलचे 7 सदस्य निवडून आले आणि विरोधी पॅनलचे 6 निवडून आले होते. निवडणूक मतमोजणी वेळी जिल्हा उपनिबंधक अशोक बिलारे यांनी बेकायदेशीपणे फेर मतमोजणीचे लिखित आदेश दिले. ज्याचे अधिकार उपनिबंधक यांना नाहीत. हे प्रकरण आमदार समर्थकांनी उच्च न्यायालयात नेले. उच्च न्यायालयाने देखील उपनिबंधक यांच्यावर ताशेरे ओढले आणि निवडणुकीला स्थगिती दिला.
(नक्की वाचा- Shocking News: 10 दिवसांचं प्रेम, रुमवर रोमान्स.. शारीरिक संबधावेळी अल्पवयीन मुलीचा मृत्यू; असं काय घडलं?)
आमदार विरोधी पॅनल सर्वोच्च न्यायालयात गेले. पण सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने केलेली कृती योग्य असल्याचं सांगितलं. यानंतर उपनिबंधक यांनी आमदार विरोधी पॅनलमधील लोकांची अशासकीय प्रशासक म्हणून नेमणूक केली. वास्तविक अशी नेमणूक करताना जॉइंट रजिस्टर यांची मंजुरी घेणे आवश्यक आहे पण एक दिवसात ही प्रक्रिया निबंधक यांनी पूर्ण करून टाकली. उपनिबंधक अशोक बिल्लारे हे या महिन्याच्या शेवटच्या तारखेला सेवानिवृत्त होणार आहेत. उपनिबंधक यांच्या विरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world