जाहिरात

BMC Housing Lottery 2025: BMC घरांसाठी पात्रता आणि अटी काय आहेत? उत्पन्न मर्यादा किती? जाणून घ्या सगळी माहिती

BMC Housing Lottery 2025: या लॉटरीसाठी अर्ज करण्यास गुरुवारपासून म्हणजेच 16 ऑक्टोबरपासून सुरूवात झाली आहे. 20 नोव्हेंबरला लॉटरी काढण्यात येणार आहे. 

BMC Housing Lottery 2025: BMC घरांसाठी पात्रता आणि अटी काय आहेत? उत्पन्न मर्यादा किती? जाणून घ्या सगळी माहिती
मुंबई:

BMC Housing Lottery 2025: बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) 426 घरांसाठी लॉटरी काढण्याचा निर्णय घेतलाय. या लॉटरीसाठी वेबसाईट तयार करण्यात आली असून त्यावर या सोडतीसंदर्भातील सगळी माहिती देण्यात आली आहे. या सोडतीसाठी माहितीपुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली असून यामध्ये अर्ज कसा करावा? उत्पन्न मर्यादा काय आहे? कोणती कागदपत्रे असणे गरजेचे आहे हा सगळा तपशील देण्यात आला आहे. याशिवाय प्रत्येक घराची किंमत किती आहे, ती कोणत्या भागात आहे हे देखील माहिती पुस्तिकेमध्ये दिले आहे. या लॉटरीसाठी अर्ज करण्यास गुरुवारपासून म्हणजेच 16 ऑक्टोबरपासून सुरूवात झाली आहे. 20 नोव्हेंबरला लॉटरी काढण्यात येणार आहे. 

नक्की वाचा: मुंबई महापालिकेची 426 घरे कुठे आहेत ? किंमतही निश्चित झाली; फॉर्म भरण्यापूर्वी ही माहिती अवश्य वाचा

BMC घरांसाठीच्या लॉटरीसाठी मुख्य अटी काय आहेत ?

  1. अर्जदार 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचा असावा
  2. अर्जदार, अर्जदाराचा पती/पत्नी, अज्ञान मुले यांच्या नावावर महापालिका हद्दीत, महापालिकेने वितरीत केलेला, खासगीरित्या संपादित केलेला निवासी गाळा, निवासी भूखंड नसावा
  3. अर्जदाराचे गेल्या 20 वर्षांत 15 वर्षे महाराष्ट्रात सलग वास्तव्य असावे. 
  4. अर्जदार आणि त्याच्या जोडीदाराचे उत्पन्न एकत्रितरित्या कौटुंबिक उत्पन्न म्हणून ग्राह्य धरले जाईल. इन्कम टॅक्स रिटर्न किंवा तहसीलदाराने दिलेला उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरला जाईल. 

नक्की वाचा: BMC कडून 426 घरांसाठी लॉटरी, अर्जापासून सोडतीच्या तारखेसंदर्भातील सगळी माहिती जाणून घ्या

BMC घरांसाठीच्या लॉटरीसाठी उत्पन्न मर्यादा किती आहे ?

अत्यल्प उत्पन्न गटाची उत्पन्न मर्यादा

  1. प्रमुख महापालिका म्हणजेच मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर क्षेत्रात राहणाऱ्यांसाठी 6लाख,
  2. उर्वरीत भागात राहणाऱ्यांसाठी साडे चार लाख

अल्प उत्पन्न गटाची उत्पन्न मर्यादा

  1. प्रमुख महापालिका म्हणजेच मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर क्षेत्रात राहणाऱ्यांसाठी  9 लाख,
  2. उर्वरीत भागात राहणाऱ्यांसाठी 7,50 लाख 

  
या लॉटरीसाठी अर्ज करायचा असल्यास कोणती कागदपत्रे गरजेची आहेत ?

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर
  4. सध्याच्या वास्तव्याचा पुरावा (आधारवर दिलेल्या पत्त्याऐवजी दुसऱ्या पत्त्यावर राहात असल्यास, तो पत्ता द्याला)
  5. डोमिसाईल सर्टिफिकेट
  6. 2024-2025 सालासाठीचे इन्कम टॅक्स रिटर्न किंवा उत्पन्नाचा दाखला
  7. अर्जदाराच्या पती अथवा पत्नीचे इन्कम टॅक्स रिटर्न 
  8. जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र
  9. पत्रकारांसाठी मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
  10. स्वातंत्र्यसैनिकांसाठी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रमाणपत्र
  11. दिव्यांग असल्यास युनिक डिसअॅबिलिटी आयडेंटीटी कार्ड
  12. सैनिक किंवा त्यांच्या कुटुंबासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सैनिक मंडळ, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचे प्रमाणपत्र
  13. माजी सैनिक असल्यास संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सैनिक मंडळ, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचे प्रमाणपत्र
  14. खासदार किंवा आमदार असल्यास संसद किंवा विधीमंडळ सचिवालयाचे पत्र
  15. बीएमसी कर्मचारी असल्यास कर्मचाऱ्याचे ओळखपत्र
  16. कलाकार असल्यास महाराष्ट्राच्या कला संचलनालयाचे पत्र 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com