नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी येथे एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याला दुसऱ्या व्यापाऱ्याच्या कुटुंबियांनी घरासमोर रस्त्यावर अडवून बेदम मारहाण केली आहे. मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मारहाणीत एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. व्यक्तीला पुढील उपचारासाठी नंदुरबार रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हायरल व्हिडीओत दिसत आहेत की, पीडित व्यक्ती दुचाकीवरून जाताना दिसत आहे. तेवढ्यात एक व्यक्ती तिथे येतो आणि त्याला मारहाण करू लागतो. काही समजण्यापूर्वीच आणखी दोन पुरुष आणि एक महिलाही घटनास्थळी येताना दिसत आहे. त्यांनीही त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. बराच वेळ त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या लोकांपासून आपला जीव वाचवून पीडित कसा तरी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी होतो.
Video :
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world