5 hours ago

Chandra Grahan 2026 LIVE: यंदाच्या वर्षातील पहिले चंद्रग्रहण आज (3 March Chandra Grahan) आहे. हिंदू धर्मामध्ये चंद्रग्रहण ही केवळ खगोलीय घटनाच नव्हे तर धार्मिकदृष्ट्याही महत्त्वाची घटना मानली जाते. ग्रहणाच्या वेळेस चंद्र किंचित लाल दिसतो, म्हणून त्याला रक्त चंद्र (Blood Moon 2026 March) असेही म्हणतात. पंचांगानुसार हे ग्रहण सिंह राशी आणि पूर्वाफाल्गुनी नक्षत्रामध्ये होत आहे. भारतीय वेळेनुसार ग्रहण दुपारी 3.20 वाजता सुरू झाले आहे, पण यावेळेस चंद्र भारतात दिसणार नाही. भारतात चंद्रोदय संध्याकाळी 6.26 वाजेपासून ते 6.32 वाजेदरम्यान होईल, यावेळेस ग्रहणाचा शेवटचा टप्पा सुरू होईल. चंद्रग्रहण संध्याकाळी 6:46 वाजेपासून ते 6:47 वाजेदरम्यान संपेल, म्हणजे भारतात केवळ 15 ते 20 मिनिटांसाठी ग्रहण दिसेल. 

धार्मिक श्रद्धेनुसार, चंद्रग्रहण सर्व राशी आणि व्यक्तींना प्रभावित करते. ग्रहण काळात मंत्रांचा जप करणे आणि देवाचे स्मरण करणे शुभ मानले जाते. तर स्वयंपाक करणे, खाणे आणि कोणतेही शुभ कार्य सुरू करणे निषिद्ध आहे. ग्रहणाची सुरुवात सुतक काळापासून होते, जो अशुभ काळ मानला जातो. सुतक काळात विशेष काळजी घेण्याचा आणि देवाचे नाव घेण्याचा सल्ला दिला जातो.

Mar 03, 2026 20:06 (IST)

Chandra Grahan 2026 LIVE: सिद्धीविनायक मंदिरात ग्रहणानंतर पुजा

चंद्रग्रहण संपल्यावर सिद्धिविनायक मंदिरात विधीवत पूजा  करण्यात आली. त्यानंतर भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. 

Mar 03, 2026 19:53 (IST)

Chandra Grahan 2026 LIVE: विठ्ठलाच्या सालंकृत पूजेनंतर भाविकांना दर्शन सुरू

 चंद्रग्रहण सुटल्यानंतर आज संध्याकाळी विठ्ठलास चंद्रभागेचे पवित्र जल आणत अभिषेक घराण्यात आला. तसेच यानंतर पंचामृताचा अभिषेक विठ्ठल अर्पण करून दररोजच्या नित्य पूजेप्रमाणे विठ्ठलाची सालंकृत पूजा करण्यात आली. यावेळी पंढरपुरातील वारकरी भक्त तसेच मंदिरातील पुजारीवर्ग सेवक वर्ग यांनी चंद्रभागेमध्ये स्नान करून चंद्रभागेतून पवित्र जल विठ्ठल मंदिरात आणले. विठ्ठलाच्या पूजेनंतर साडेसात वाजता विठ्ठलाचे दर्शन सर्वांसाठी खुले करण्यात आले.

Mar 03, 2026 19:12 (IST)

Chandra Grahan 2026 LIVE: तुळजापूर येथील आई तुळजाभवानी देवीला चंद्रग्रहणादरम्यान ठेवण्यात आलं सोवळ्यात

आज खग्रास चंद्रग्रहणाच्या वेळी तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात परंपरेनुसार श्री तुळजाभवानी देवींस विधीवत स्नान घालून सोवळ्यात (श्वेत वस्त्र परिधान करून) ठेवण्यात आले. चंद्रग्रहण समाप्तीनंतर श्री तुळजाभवानी देवीची सिंहासन पूजा, पंचामृत स्नान व शुद्धस्नान आरती व धुपारती हे दैनंदिन धार्मिक विधी परंपरेनुसार करण्यात येणार आहेत. आजच्या या चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थांकडून मोठी तयारी करण्यात आली आहे.

Mar 03, 2026 19:06 (IST)

Chandra Grahan 2026 LIVE: विठ्ठलाची पूजा झाल्यानंतर साडेसात वाजता दर्शन सुरू होईल

विठ्ठलाची पूजा झाल्यानंतर साडेसात वाजता दर्शन सुरू होईल

सात वाजता होणारी धुपारती आज साडेनऊ वाजता होईल

 

तर साडेनऊ वाजताच विठ्ठलास पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवला जाईल

Advertisement
Mar 03, 2026 19:02 (IST)

Chandra Grahan 2026 LIVE: ग्रहण काळ संपल्यानंतर विठ्ठलाला चंद्रभागेच्या पाण्याने स्नान

पंढरपूर 

ग्रहण काळ संपल्यानंतर विठ्ठलाला चंद्रभागेच्या पाण्याने स्नान 

विठ्ठल आणि रुक्मिणीला जलाभिषेक झाला सुरू

विठ्ठल आणि रुक्मिणी मातेसाठी ग्रहण सुटल्यानंतर चंद्रभागेचे आणले विशेष जल

Mar 03, 2026 18:58 (IST)

Chandra Grahan 2026 LIVE: दिल्लीत स्पष्ट पणे दिसलं चंद्रग्रहण

Advertisement
Mar 03, 2026 18:55 (IST)

Chandra Grahan 2026 LIVE: भारतात चंद्रग्रहण काळ संपला

भारतात चंद्रग्रहण काळ संपला आहे. देशात अनेक ठिकाणी ग्रहण पाहात आले. मात्र मुंबईत ग्रहण स्पष्ट दिसू शकले नाही. ढगाळ आणि धुरकट वातावरण असल्यामुळे ग्रहण पाहाता आले नाही. मुंबईत फक्त दोन मिनिट ग्रहण दिसणार होते. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. 

Mar 03, 2026 18:45 (IST)

Chandra Grahan 2026 LIVE: दिल्ली कोलकाता, रांची मध्ये चंद्रग्रहण पाहिले गेले

दिल्ली कोलकाता, रांची मध्ये चंद्रग्रहण पाहाता आले आहे. 

Advertisement
Mar 03, 2026 18:41 (IST)

Chandra Grahan 2026 LIVE: बिहारच्या औरंगाबाद आणि ओडीशाच्या भुवनेश्वरमध्ये दिसले चंद्रग्रहण

बिहारच्या औरंगाबाद आणि ओडीशाच्या भुवनेश्वरमध्ये दिसले चंद्रग्रहण 

Mar 03, 2026 18:39 (IST)

Chandra Grahan 2026 LIVE: मुंबईमध्ये संध्याकाळी 6.45 ते 6.47 पर्यंत चंद्रग्रहण पाहाता येणार

मुंबईमध्ये संध्याकाळी 6.45 ते  6.47 पर्यंत चंद्रग्रहण पाहाता येणार आहे. तर पुण्यात 6.41 ते 6.47 वाजता चंद्रग्रहण पाहाता येणार आहे. या कालावधीतच महाराष्ट्रातल्या इतर शहरात ही चंद्रग्रहण पाहाता येणार आहे. 

Mar 03, 2026 18:36 (IST)

Chandra Grahan 2026 LIVE: मुजफ्फरपुरमध्ये दिसलं चंद्रग्रहण

Chandra Grahan 2026 LIVE: मुजफ्फरपुरमध्ये दिसलं चंद्रग्रहण, उत्तर भारतात अनेक ठिकाणी चंद्रग्रहण पाहाता आले आहे. 

Mar 03, 2026 18:34 (IST)

Chandra Grahan 2026: भूकंप आणि ग्रहण यांचा काही संबंध आहे का?

Mar 03, 2026 18:26 (IST)

Chandra Grahan 2026: नागावमध्ये दिसला चंद्रग्रहणाचा अद्भूत नजारा

Mar 03, 2026 18:24 (IST)

Chandra Grahan 2026: चंद्रग्रहणाचे पहिले छायाचित्र पाहा

Mar 03, 2026 18:20 (IST)

Chandra Grahan 2026 LIVE: आसाममध्ये लोक पाहात आहेत चंद्रग्रहण

Mar 03, 2026 18:11 (IST)

Chandra Grahan 2026 LIVE: उत्तर भारतात चंद्रग्रहण दिसायला सुरूवात

उत्तर भारतात राहणाऱ्या लोकांसाठी आजचे चंद्रग्रहण पाहण्याची संधी फार थोडा वेळ असणार आहे. दिल्ली, लखनौ आणि राजस्थानमध्ये चंद्र सायंकाळी ६:०० वाजता उगवेल. ग्रहण संपायला अवधी कमी असल्याने तिथल्या लोकांना रक्ताळलेला चंद्र (Blood Moon) पाहता येणार नाही, तर केवळ ग्रहणाचा शेवटचा भाग दिसेल. सध्या उत्तर भारतात चंद्र ग्रहण पाहाता येत आहे. 

Mar 03, 2026 17:49 (IST)

Chandra Grahan 2026 LIVE: 'खग्रास' काळ संपला, आता दिसणार आंशिक ग्रहण; पाहा पुढची वेळ

सायंकाळी 5:33 वाजता चंद्रग्रहणातील मुख्य थरार म्हणजेच 'खग्रास' टप्पा संपला आहे. गेल्या पाऊण तासापासून आकाशात रक्तासारखा लाल दिसणारा चंद्र आता पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात येण्यास सुरुवात झाली आहे. पृथ्वीच्या गडद सावलीतून चंद्र आता हळूहळू बाहेर पडत असल्याने, रंगाचा तो गडद तांबूसपणा आता ओसरताना दिसत आहे.

Mar 03, 2026 17:48 (IST)

Chandra Grahan 2026 LIVE: भारतात थोड्याच वेळात दिसणार चंद्रग्रहण

भारतात थोड्याच वेळात दिसणार चंद्रग्रहण 

दुपारी चंद्रग्रहणाला सुरूवात झाली असली तरी भारतात आता थोड्या वेळात ते दिसणार आहे. अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये सर्वात आधी ते पाहाता येणार आहे.

Mar 03, 2026 17:24 (IST)

Chandra Grahan 2026 LIVE: जगात अनेक ठिकाणी दिसत आहे ब्लड मून

आजचे चंद्रग्रहण आता आपल्या सर्वोच्च बिंदूवर (Peak) पोहोचले असून, जगाच्या अनेक भागांमध्ये दुर्मिळ 'ब्लड मून'चे दर्शन घडत आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार ग्रहणाची प्रक्रिया प्रगत टप्प्यात असल्याने, ज्या ठिकाणी चंद्र क्षितिजावर आला आहे, तिथे तो गडद लाल किंवा तांबूस रंगाचा दिसत आहे. खगोलशास्त्रात या स्थितीला 'ब्लड मून' असे संबोधले जाते. उत्तर अमेरिका, आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रातील अनेक देशांमध्ये हे दृश्य स्पष्टपणे दिसत आहे. भारतातही पूर्व भागात चंद्रोदयानंतर हा तांबूस चंद्र खगोलप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे. सायंकाळी ६:४७ पर्यंत ही स्थिती कायम राहणार असून, संशोधकांसाठी ही अभ्यासाची मोठी संधी आहे.

Mar 03, 2026 17:17 (IST)

Chandra Grahan 2026 LIVE: काशी-विश्वनाथ मंदिराचे दरवाजे ग्रहण काळात करण्यात आले बंद

Mar 03, 2026 17:07 (IST)

Chandra Grahan 2026 LIVE: खग्रास चंद्रग्रहणादरम्यान औंढा नागनाथ मंदिर साडेतीन तास बंद

देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथील मंदिर खग्रास चंद्रग्रहणादरम्यान भाविकांसाठी बंद करण्यात आला आहे.  दुपारी साडेतीन ते सायंकाळी पावणे सात पर्यंत हे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद असणार आहे, आठवे ज्योतिर्लिंगावर चंद्रग्रहणावेळी पांढरे वस्त्र टाकून मंत्रोच्चार करण्यात येत आहे तर चंद्रग्रहण झाल्यानंतर नैवेद्य दाखविल्यानंतर महाआरती झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले केले जाणार आहे.

Mar 03, 2026 17:05 (IST)

Chandra Grahan 2026 LIVE: जगभरात बघीतलं जात आहे 'Blood Moon'

Mar 03, 2026 17:03 (IST)

Chandra Grahan 2026: सर्वात आधी चंद्रग्रहण कुठे दिसणार?

आज होणाऱ्या चंद्रग्रहणाची उत्सुकता संपूर्ण देशाला लागली आहे. पण तुम्हाला माहित आहे का, भारतात सर्वात आधी हे ग्रहण कुठे दिसणार? त्याचे उत्तर आहे अरुणाचल प्रदेश! ईशान्येतील या निसर्गरम्य राज्यातील 'तेजू' नगरमध्ये सर्वात आधी चंद्रदर्शन होणार आहे. सायंकाळी बरोबर 5:03 मिनिटांनी तिथे चंद्र उगवेल आणि ग्रहणाचे दर्शन सुरू होईल.

Mar 03, 2026 16:15 (IST)

Chandra Grahan 2026: चंद्रग्रहणाचं संपूर्ण वेळापत्रक पाहा

आज होणाऱ्या चंद्रग्रहणाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार (IST) ग्रहणाची सुरुवात दुपारी 3:20 वाजता होईल. ज्यांना खगोलशास्त्रीय घटनांमध्ये रस आहे, त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे.

वेळापत्रक एका नजरेत:

  • ग्रहण प्रारंभ: दुपारी 3:20

  • खग्रास प्रारंभ: दुपारी 4:34

  • ग्रहणाचा मध्य: सायंकाळी 5:33

  • ग्रहण समाप्ती: सायंकाळी 6:47

Mar 03, 2026 16:11 (IST)

Chandra Grahan 2026 News Live Updates:चंद्रग्रहणात गर्भवती महिलांनी 'या' चुका टाळा

3 मार्च रोजी दुपारी 3:20 ते संध्याकाळी 6:47 या वेळेत होणारे चंद्रग्रहण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. विशेषतः गर्भवती महिलांसाठी हा काळ अत्यंत संवेदनशील असतो. शास्त्रांनुसार, ग्रहणादरम्यान चंद्राकडून येणारी किरणे अशुद्ध मानली जातात, ज्याचा परिणाम गर्भावर होऊ शकतो, अशी मान्यता आहे.

Mar 03, 2026 16:06 (IST)

Chandra Grahan 2026 News Live Updates:भारतातील अरुणाचल प्रदेश या राज्यात सर्वात आधी दिसणार चंद्रग्रहण

अरुणाचल प्रदेश हे आज चंद्रग्रहण पाहणारे पहिले राज्य असेल. येथील तेजू शहरात संध्याकाळी 5.03 वाजता चंद्रोदय होईल, ज्यामुळे चंद्रग्रहण पाहणारे अरुणाचल प्रदेश पहिले राज्य ठरेल.

Mar 03, 2026 16:04 (IST)

Chandra Grahan 2026 News Live Updates: दिल्लीसह जयपूरमध्ये या वेळेत दिसेल चंद्रग्रहण?

  1. दिल्ली  संध्याकाळी  6.22 वाजता
  2. नोएडा संध्याकाळी 6.20 वाजता
  3. गुरुग्राम संध्याकाळी 6.02 वाजता
  4. लखनऊ  संध्याकाळी  6.02 वाजता
  5. कोलकाता संध्याकाळी  5.43 वाजता  
  6. भोपाळ  संध्याकाळी 6.21 वाजता
  7. चैन्नई संध्याकाळी 6.21 वाजता
  8. पाटणा संध्याकाळी 5.55 वाजता
  9. बंगळुरू संध्याकाळी  6.32 वाजता
  10. हैदराबाद संध्याकाळी 6.26 वाजता
  11. कानपूर   संध्याकाळी   6.14 वाजता
  12. वाराणसी संध्याकाळी 5.43वाजता
  13. प्रयागराज संध्याकाळी 5.55 वाजता
  14. इंदुर संध्याकाळी 6.26 वाजता
  15. देहरादून संध्याकाळी 6.14 वाजता
  16. मथुरा संध्याकाळी 6:25 वाजता
  17. चंडीगड संध्याकाळी 6:27 वाजता
  18. जयपूर संध्याकाळी 6.14 वाजता

Mar 03, 2026 16:00 (IST)

Chandra Grahan 2026 News Live Updates: ग्रहणात कोणत्या मंत्राचा जप करणं फलदायी ठरेल?

Chandra Grahan 2026 Live : ग्रहणाच्या वेळी मंत्रांचा जप करणे खूप फलदायी मानले जाते. ज्यांच्या कुंडलीत चंद्र ग्रहाची स्थिती कमकुवत आहे ती मंडळी चंद्रांशी संबंधित मंत्राचा जप करू शकता, उदाहरणार्थ 'ॐ श्रां श्रीं श्रौं सः चन्द्रमसे नमः.' या व्यतिरिक्त'ॐ नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करू शकता.  

महामृत्युंजय मंत्र आणि गायत्री मंत्राचा जप करणे देखील फायदेशीर मानले जाते.

Mar 03, 2026 15:58 (IST)

Chandra Grahan 2026 News Live Updates: चंद्रग्रहणाचा सुतक काळ कधी संपणार?

ग्रस्तोदित चंद्रग्रहणाचा सुतक काळ संध्याकाळी 6.47 वाजता संपणार आहे, यासह ग्रहणही संपेल. 

Mar 03, 2026 15:56 (IST)

Chandra Grahan 2026 LIVE: चंद्र ग्रहणात कोणत्या मंत्रांचा जप करावा?

1. महामृत्युंजय मंत्र 

ॐ त्र्यम्बकं यजामहे

सुगन्धिं पुष्टिवर्धनम्

उर्वारुकमिव बन्धनान्

मृत्योर्मुक्षीय मामृतात्

2. गायत्री मंत्र

ॐ भूर्भुवः स्वः

तत्सवितुर्वरेण्यं

भर्गो देवस्य धीमहि

धियो यो नः प्रचोदयात्

Mar 03, 2026 15:48 (IST)

Chandra Grahan 2026 News Live Updates:चंद्रग्रहणाच्या वेळी कपडे धुणे योग्य की अयोग्य?

Chandra Grahan 2026: धार्मिकदृष्ट्या ग्रहणाच्या वेळी कपडे धुणे, स्वयंपाक करणे, झाडू लावणे, पुसणे किंवा मशीन, चाकू आणि कात्री यासारखी साधने वापरणे निषिद्ध आहे. असे मानले जाते की ग्रहण सामान्य कामांसाठी अनुकूल नाही. सुतक काळ सुरू होण्यापूर्वी किंवा सुतक काळानंतर महत्त्वाची कामे पूर्ण करणे चांगले मानले जाते.

Mar 03, 2026 15:45 (IST)

Chandra Grahan 2026 News Live Updates: कोणत्या राशींसाठी चंद्रग्रहण शुभ ठरेल?

ज्योतिषी डॉ. गौरव कुमार दीक्षित यांच्या मते, वृषभ, मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण सकारात्मक मानले जात आहे. त्यांच्या जीवनात मोठे बदल होऊ शकतात. त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते आणि प्रलंबित कामे पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. संपत्ती, पद आणि प्रतिष्ठेत वाढ होण्याची शक्यता आहे.

Mar 03, 2026 15:42 (IST)

Chandra Grahan 2026 News Live Updates: चंद्रग्रहण कुठे-कुठे दिसणार?

Chandra Grahan 2026: ग्रहण दिसणारे प्रदेश - भारतासह पूर्व आशिया, जपान,रशियाचा मध्य व पूर्व प्रदेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, संपूर्ण अमेरिका, कॅनडा, ग्रीनलँड, दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्टिकाचा काही प्रदेश या भागात हे ग्रहण दिसेल.

Mar 03, 2026 15:37 (IST)

Chandra Grahan 2026 News Live Updates: चंद्रग्रहणाच्या वेळेस आकाशाकडे पाहावे की पाहू नये? ज्योतिषांकडून शुभ-अशुभ परिणाम जाणून घ्या

NDTVला दिलेल्या विशेष मुलाखतीत ज्योतिषी डॉ. गौरव कुमार दीक्षित यांनी स्पष्ट केले की, हे चंद्रग्रहण सिंह राशीत होईल. सिंह रास आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात होणाऱ्या या ग्रहणाचा वेगवेगळ्या राशींवर वेगवेगळा परिणाम होईल.

कर्क, सिंह, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांनी हे ग्रहण पाहू नये. शिवाय ज्यांच्या जन्मकुंडलीत चंद्र कमकुवत आहे, अशुभ ग्रहांनी ग्रस्त आहेत किंवा अशक्त राशीत आहेत, त्यांनीही ग्रहण पाहणे टाळावे. या राशींना आर्थिक नुकसान, आजार आणि मानसिक नैराश्याचा सामना करावा लागू शकतो. गर्भवती महिलांना ग्रहणाच्या वेळी घराबाहेर जाण्याचे किंवा आकाशाकडे पाहण्याचे टाळण्याचा सल्ला दिला जातो. त्यांनी विशेष काळजी घ्यावी आणि घरातच राहावे.

 

Mar 03, 2026 15:34 (IST)

Chandra Grahan 2026 News Live Updates: सुतक काळ म्हणजे काय?

हिंदू धर्मामध्ये सुतक म्हणजे ग्रहण सुरू होण्याच्या काही तास आधी सुरू होणारा आणि तो संपेपर्यंत चालू राहणारा काळ. धार्मिक मान्यतेनुसार, हा काळ सामान्य दिवसांपेक्षा अधिक संवेदनशील मानला जातो, म्हणून या काळात काही नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो.

सुतकची गणना ग्रहणाच्या प्रकारावर अवलंबून असते. जर ते चंद्रग्रहण असेल तर सुतक ग्रहण सुरू होण्याच्या अगदी 9 तास आधी सुरू होते. सूर्यग्रहणाच्या बाबतीत हा काळ 12 तास आधी सुरू होतो. उदाहरणार्थ जर चंद्रग्रहण संध्याकाळी 6 वाजता सुरू झाले तर सुतक काळ सकाळी 9 वाजेपासून सुरू होईल. ग्रहण संपताच सुतक काळही संपुष्टात येते. यास ग्रहणाचा वेध काळ असेही म्हणतात.

Mar 03, 2026 15:24 (IST)

Chandra Grahan 2026 Time: पुणे-मुंबईसह 35 जिल्ह्यांतील चंद्रग्रहणाची अचूक वेळ, सुतक काळ आणि नियम सविस्तर वाचा, येथे क्लिक करा

Chandra Grahan 2026 Time: 3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण आहे. देशभरात चंद्रग्रहणाला सुरुवात झाली आहे, संध्याकाळी 6.47 वाजता ग्रहण संपेल.

Mar 03, 2026 15:12 (IST)

Chandra Grahan 2026 News Live Updates: चंद्रग्रहणाच्या वेळी तुळशीच्या पानाचा उपाय नक्की करा

ग्रहणाच्या वेळी स्वयंपाकामध्ये तुळशीची पाने ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे अन्न शुद्ध राहते, असे म्हणतात. जर तुम्ही घरी स्वयंपाक केला असेल तर तुळशीची पाने ठेवा ते झाकून ठेवा. 

Mar 03, 2026 15:10 (IST)
Mar 03, 2026 15:09 (IST)

Chandra Grahan 2026 News Live Updates: सुतक काळात या 5 गोष्टी टाळा

आज (3 मार्च) सकाळी 6.20 वाजता सुतक काळ सुरू झाला आहे. सुतक काळात शुभ कार्ये करणं टाळलं जाते आणि मंदिराचे दरवाजेही बंद केले जातात.  अन्य काही कामांमध्ये सहभागी होऊ नये, असाही सल्ला दिला जातो. उदाहरणार्थ सुतक काळात स्वयंपाक करणे, खाणे, पूजा करणे, हवन, यज्ञ करणे, नवीन प्रकल्प सुरू करणे किंवा मोठी गुंतवणूक करणे टाळावे. या काळात चाकू आणि कात्री यासारख्या धारदार वस्तूंचा वापरही टाळावा. ग्रहण काळात तेल लावू नये. केस आणि नखे कापणे देखील टाळावे.

Mar 03, 2026 15:04 (IST)

Chandra Grahan 2026 News Live Updates: ग्रहणकाळात सावधान ! चंद्रग्रहणात कोणत्या राशींना फटका? कोणाला फायदा? पाहा संपूर्ण व्हिडीओ

Mar 03, 2026 15:01 (IST)

Chandra Grahan 2026 News Live Updates: ग्रस्तोदित चंद्रग्रहण म्हणजे काय?

ज्योतिषाचार्य डॉ. गौरव कुमार दीक्षित यांनी 'एनडीटीव्ही'शी बातचीत करताना सांगितलं की, या चंद्रग्रहणाला 'ग्रस्तोदित' म्हणण्याचे कारण म्हणजे जेव्हा ग्रहणाची सुरुवात होईल, तेव्हा भारतात चंद्रोदय झालेला नसेल. सोप्या भाषेत सांगायचे तर ग्रहणाला आधीच सुरुवात झालेली असते पण आपल्या भारत देशामध्ये चंद्रोदय होईल तेव्हा ग्रहणाचा शेवटचा टप्पा सुरू असेल, अशा स्थितीला 'ग्रस्तोदित' म्हटले जाते. म्हणजेच ग्रहण लागलेले चंद्रबिंब उदयास येईल.

Mar 03, 2026 15:00 (IST)

Chandra Grahan 2026 Sutak Time: चंद्रग्रहणात आज संपूर्ण दिवस सुतक, वेधकाळ सकाळी 6.20 वाजेपासून सुरू; वाचा 12 नियमांची यादी, येथे क्लिक करा

Chandra Grahan 2026 Sutak Time: यंदाच्या वर्षातील पहिले चंद्रग्रहण आज लागणार आहे. ग्रहणाचा सुतक काळ सकाळी 6.20 वाजता सुरू झाला. या काळात कोणते काम करावे आणि कोणत्या गोष्टी टाळाव्या, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

Mar 03, 2026 14:58 (IST)

Chandra Grahan 2026 Timing: धूलिवंदनाला दिसणार Blood Moon, चंद्रग्रहण कधी सुरू होणार? सुतक काळ, मोक्षस्नानाची वेळ; जाणून घ्या दाते पंचांगानुसार माहिती, येथे क्लिक करा

Chandra Grahan 2026 Timing: चंद्रग्रहण कधी सुरू होणार आहे? चंद्रग्रहण कधी संपणार आहे? सुतक काळ, ग्रहणादरम्यान काय करावे आणि काय टाळावे? जाणून घ्या माहिती.

Mar 03, 2026 14:53 (IST)

Chandra Grahan 2026 News Live Updates: चंद्रग्रहणाचा सुतक काळ 9 तास आधी सुरू, ज्योतिषी दीक्षितांनी सांगितलेले हे नियम पाळाच - येथे क्लिक करा

Chandra Grahan 2026 Vastu Tips: होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 मार्च 2026 रोजी चंद्रग्रहण लागणार असून त्यासोबत सूतक काळही सुरू झालाय. या काळात घरातील आणि परिसरातील ऊर्जा बदलते,असे म्हणतात. त्यामुळे काही गोष्टी वेळेवर दूर केल्यास नकारात्मक परिणाम कमी होऊ शकतो. नेमक्या कोणत्या काळजी घ्याव्यात? जाणून घ्या सविस्तर.

Mar 03, 2026 14:50 (IST)

Chandra Grahan 2026 News Live Updates: चंद्रग्रहण काळात हे मंदिर बंद नसते, कारण... येथे क्लिक करा

Chandra Grahan 2026: चंद्रग्रहणाच्या दिवशी देशातील बहुतांश मंदिर बंद केले जातात, येथील पूजा-पठण रोखले जाते. पण देशातील अशीही काही मंदिर आहेत, जेथे हे ग्रहणाचे नियम लागू होत नाहीत. जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Mar 03, 2026 14:49 (IST)

Chandra Grahan 2026 News Live Updates: अयोध्येतील राम मंदिर मोक्षकाळानंतर दर्शनासाठी खुले होईल

भाविकांना अयोध्येतील राम मंदिराचे मोक्षकाळनंतर रात्री 8.30 वाजता  मिळेल.

Mar 03, 2026 14:40 (IST)

Chandra Grahan 2026 News Live Updates: महाराष्ट्रात कुठे आणि कधी दिसणार चंद्रग्रहण?

  1. सोलापूर : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.33 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
  2. ठाणे : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.44 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
  3. वर्धा : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.20 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
  4. वाशिम : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.27 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
  5. यवतमाळ : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.22 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.

Mar 03, 2026 14:39 (IST)

Chandra Grahan 2026 News Live Updates: महाराष्ट्रात कुठे आणि कधी दिसणार चंद्रग्रहण?

  1. नाशिक : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.41 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
  2. धाराशिव : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.32 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
  3. पालघर : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.45 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
  4. परभणी : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.29 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
  5. पुणे : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.41 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
  6. रायगड : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.45 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
  7. रत्नागिरी : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.44 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
  8. सांगली : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.39 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
  9. सातारा : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.41 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
  10. सिंधुदुर्ग : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.43 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.

Mar 03, 2026 14:36 (IST)

Chandra Grahan 2026 News Live Updates: महाराष्ट्रात कुठे, कधी दिसणार चंद्रग्रहण?

  1. गोंदिया : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.13 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
  2. हिंगोली : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.27 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
  3. जळगाव : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.33 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
  4. जालना : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.32 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
  5. कोल्हापूर : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.40 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
  6. लातूर : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.30 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
  7. मुंबई : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.45 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
  8. नागपूर : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.18 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
  9. नांदेड : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.26 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
  10. नंदुरबार : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.38 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.

Mar 03, 2026 14:35 (IST)

Chandra Grahan 2026 News Live Updates: महाराष्ट्रात कुठे कधी दिसणार चंद्रग्रहण?

  1. अहिल्यानगर : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.37 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
  2. अकोला : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.27 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
  3. अमरावती : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.24 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
  4. छत्रपती संभाजीनगर : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.34 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
  5. बीड : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.33 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
  6. भंडारा : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.16 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल. 
  7. बुलडाणा : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.30 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
  8. चंद्रपूर : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.18 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
  9. धुळे : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.36 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
  10. गडचिरोली : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.15 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.

Mar 03, 2026 14:32 (IST)

Chandra Grahan 2026 News Live Updates: ग्रस्तोदित चंद्रग्रहण म्हणजे काय? येथे क्लिक करा

Chandra Grahan 2026: धूलिवंदनाच्या दिवशी यंदाचे पहिले चंद्रग्रहण लागणार आहे, पण या ग्रहणाला 'ग्रस्तोदित चंद्र ग्रहण' का म्हटलंय जातंय? ज्योतिषाचार्यांकडून याचा अर्थ जाणून घ्या...

Mar 03, 2026 14:31 (IST)

Chandra Grahan 2026 News Live Updates: चंद्रग्रहण सुतक काळ कधी सुरू होईल?

चंद्रग्रहण भारतात दिसणार असल्याने, सुतक काळ वैध असेल. 3 मार्च रोजी सकाळी 6.20 वाजता सुतक काळ सुरू झाला आहे. धार्मिक मान्यतेनुसार सुतक काळादरम्यान पूजा, मंदिर प्रवेश आणि शुभ कार्ये टाळावी.

Mar 03, 2026 14:27 (IST)

Chandra Grahan 2026: आज चंद्रग्रहण किती वाजता सुरू होईल?

चंद्रग्रहण दुपारी 3:20  वाजता सुरू होईल, पण भारतात चंद्रोदय संध्याकाळी  6:26 वाजेपासून ते 6:32 वाजेदरम्यान होईल. त्यावेळेस ग्रहणाचा शेवटचा टप्पा सुरू असेल. ग्रहण संध्याकाळी 6:46 वाजेपासून ते 6:47 वाजेदरम्यान संपेल. याचा अर्थ असा की भारतात हे ग्रहण फक्त 15-20 मिनिटांसाठीच दिसेल.