CM शिंदे, फडणवीस- पवारांची पत्रकार परिषद! ऐतिहासिक विजयानंतर कोण काय म्हणाले?

विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत तिन्ही नेत्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले.

जाहिरात
Read Time: 3 mins

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेचा निकाल जाहीर झाला असून महायुतीने अभूतपुर्व असा विजय संपादन केला आहे. महायुतीच्या या ऐतिहासिक विजयानंतर राज्यभरात महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात आहे. या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत तिन्ही नेत्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. तसेच विरोधकांवरही जोरदार हल्लाबोल केला. 

काय म्हणाले अजित पवार?
 'आपण आज सकाळी मतमोजणी सुरु होईपर्यंत प्रत्येक जण अंदाज व्यक्त करत होते. आम्ही कशात नसल्यासारखे करत होते. गाड्या फिरवणे सुरु होते. हे चित्र बघून आम्हाला वाटलं आम्ही तळाला जातोय की काय परंतु महाराष्ट्रातल्या जनतेने विकासाकडे बघून महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी  केलं. त्याबद्दल सर्वांचे आभार, ' असे अजित पवार म्हणाले.

नक्की वाचा: दिलीप वळसे पाटील हरलेली बाजी जिंकले, तुतारी - पिपाणीच्या घोळ पथ्थ्यावर

'आमच्या योजनांची चेष्टा मस्करी केली, दोष देण्यात आला. टिका टिप्पणी करण्यात आली. मात्र त्यांचे जाहीरनामे बाहेर आल्यानंत रकुठलाही हिशोब  नसल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीत आम्हाला मोठे अपयश आले. आम्ही तो मान्य केला. त्यातून सावरलो. अर्थसंकल्पात मोठ्या योजना आणल्या. त्यामधील लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. आजपर्यंत मी राजकीय इतिहासात असा विजय पाहिलेला नाही. या यशाने आम्ही हुरळून जाणार नाही, जमीनीवर पाय ठेऊन काम करु. आमची जबाबदारी वाढली आहे. आमच्या पाठिशी केंद्र सरकार आहे. त्यामुळे तो आम्हाला एक भक्कम आधार आहे,' असंही ते म्हणाले. 

महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही नतमस्तक आहोत. जनतेने ज्याप्रकारे विजय दिला आहे. खऱ्या अर्थाने आमची जबाबदारी वाढली आहे. जनतेने पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवला. सगळ्यांचे आभार. आजचा महाराष्ट्रातला ऐतिहासिक दिवस आणि विजय आहे. आजपर्यंत अनेक निवडणूका पाहिल्या परंतु ही निवडणूक लोकांनी हातात घेतली होती.

महत्वाची बातमी: 40 वर्ष, 3 पक्ष, 9 वेळा आमदार... भाजपचे कालिदास कोळंबकरांची तिसऱ्यांदा हॅटट्रिक

मुख्यमंत्री शिंदेंकडून जनतेचे आभार

'लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी सगळ्याच घटकातील लोकांनी प्रेम दाखवले. सर्व मतदारांचे आभार मानतो. या ऐतिहासिक विजयासाठी साष्टांग दंडवत घातला पाहिजे. आम्ही जे काम केलं, जे निर्णय घेतले ते  आत्तापर्यंतच्या इतिहासातले न भुतो न भविष्य अशी होती. महाविकास आघाडीने बंद  पाडलेली सर्व कामे आम्ही सुरु केली. कामाला आम्ही प्राथमिकता दिली. राज्याचा सर्वांगिण विकास करताना सर्व घटकांना आम्ही समोर ठेवले. लोकांना आपण मेट्रो दिली, समृद्धी दिली. अनेक कल्याणकारी योजना दिल्या. त्यामध्ये लाडकी बहीण लाडका भाऊ योजना, शेतकरी विजबिल माफ केले.

विरोधकांवर निशाणा! 

'एकीकडे विकास आणि कल्याणकारी योजनांची आम्ही सांगड  घालण्याचा प्रयत्न केला. आता कॉमन मॅनच्या जिवनात बदल  घडवायचा आहे. लोकांनी कल्याणाचे आणि विकासाचे राजकारण स्विकारले.द्वेषाचे, सूडाचे, आरोपाचे राजकारण झिडकारले. लोक आमचे सरकार झाल्यापासून रोज सरकार पडणार म्हणत होते. आम्ही त्यांना कामातून उत्तर दिले. ते त्यांना भावले. यामुळे घरी बसून सरकार चालवता येत नाही. फेसबुकवरुन सरकार चालवता येत नाही, हे स्पष्ट झाले.  राष्ट्रवादी कोणाची, शिवसेना कोणाची हे लोकांनी ठरवले: लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना जोडा दाखवला,' असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. 

ट्रेंडिंग बातमी: Maharashtra Election Result : शिवसेना शिंदेंचीच, महाराष्ट्राचा फैसला! बालेकिल्ल्यात ठाकरेंना धक्का