दिपेशकुमार टेंभारे, गोंदिया: विधानसभेचे मतदान होण्याआधीच महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री कोण? याबाबत दावे- प्रतिदावे अन् वाद रंगताना दिसत आहे. एकीकडे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर दावा करत असतानाच काँग्रेसमध्येही CM पदावरुन अंतर्ग कुरघोड्या सुरु झाल्या आहेत. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत एक महत्वाचे विधान करत काँग्रेसमध्ये आपणच दावेदार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आमगाव-देवरी विधानसभा मतदार संघांचे महाविकास आघाड़ीचे अधिकृत उमेदवार राजकुमार लोटुजी पुराम यांच्या प्रचारार्थ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना नाना पटोले यांनी राजकुमार यांना निवडून देण्याचे आवाहन करत असतानाच मुख्यमंत्रीपदाबाबत सर्वात मोठे विधान केले. नानाभाऊ महाराष्ट्रामध्ये काय बनणणार आहे हे तुम्हाला माहित आहे, असं ते म्हणाले.
नक्की वाचा: गद्दारांचे काय? जाहीर सभेत चिठ्ठी आली अन् शरद पवार गरजले, नेमकं काय घडलं?
काय म्हणाले नाना पटोले?
"राजकुमार पुराम याला आमदार बनवायचे आहे नाही बनवलं तुम्ही, तर महाराष्ट्रात नानाभाऊ उद्या काय बनणार आहे हे तुम्हाला माहितच आहे. तुम्ही एक एक आमदार नाही दिले तर अडचण येणार आहे. शेतकऱ्यांचे गरिबांचे सरकार पाहिजे असेल तर म्हाला राजकुमार पुराम निवडून द्यावाच लागणार, असे महत्वाचे विधान नाना पटोले यांनी केले. नाना पटोले यांच्या या वक्तव्याने मुख्यमंत्रीपदाबाबत आपण तयार असल्याचेच स्पष्ट संकेत दिल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाविकास आघाडीमधील मुख्यमंत्रीपदाच्या फॉर्म्युलाबाबत एक महत्वाचे विधान केले होते. महाविकास आघाडीमध्ये ज्याचे सर्वाधिक आमदार निवडून येतील त्याचाच मुख्यमंत्री असेल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. ्अशातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world