सौरभ वाघमारे, सोलापूर
सोलापूर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी बाजी मारली आहे. भाजपच्या राम सातपुते यांचा त्यांनी पराभव केला. निवडणुकीनंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांचा सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लान होता, असा आरोप त्यांनी केला आहे. मतदानाच्या दोन दिवस आधी या गोष्टी घडवण्याचा प्रयत्न झाला. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर कृतज्ञता मेळाव्यात बोलताना खासदार प्रणिती शिंदे हा खळबळजनक आरोप केला आहे.
नक्की वाचा - 'राम भाजपमुक्त झाला' नरेटिव्हवरून ठाकरेंची जोरदार फटकेबाजी
जिल्ह्यात येऊन गावा-गावांमध्ये येऊन भांडणं आणि दंगल लावण्याचा प्रयत्न ते करणार होते. याचं उदाहरण तुमच्या समोर आहे. मतदानाच्या दिवशी पोलिंग बूथवर काय झालं होतं. पोलीस आयुक्तांनी सांगितलं होतं, बाहेर जा अन्यथा मला उमेदवारावर गुन्हा दाखल करावा लागेल, असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं.
(नक्की वाचा - रक्षा खडसे केंद्रात मंत्री झाल्या, पहिल्यांदाच जळगावात आल्या, सर्वात आधी काय केलं?)
भाजपवाल्यांना कळलं होतं की निवडणूक आपल्या हातातून गेली आहे. आता एकच उपाय आहे ते म्हणजे दंगल लावा. तुम्ही त्यांची मतदानाच्या चार-पाच दिवस आधीची भाषणे बघा. लोकांमध्ये विभागणी करा आणि जिंका, असं त्यांना सांगण्या त आलं होतं, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world