जाहिरात
This Article is From Jun 17, 2025

Sudhakar Badgujar : सलीम कुत्तासोबत डान्स ते अंडरवर्ल्डशी संबंधाचा आरोप, भाजपमध्ये एन्ट्री करणारे सुधाकर बडगुजर कोण आहेत?

सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांच्या मुलावरही मोक्काअंतर्गत कारवाई झाल्याचं सांगितलं जातं.

Sudhakar Badgujar : सलीम कुत्तासोबत डान्स ते अंडरवर्ल्डशी संबंधाचा आरोप, भाजपमध्ये एन्ट्री करणारे सुधाकर बडगुजर कोण आहेत?

शिवसेना ठाकरे गटाकडून हकालपट्टी करण्यात आलेले नेते सुधाकर बडगुजर अखेर आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे. अनेक वादांमध्ये अडकलेले बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावरुन स्थानिक नेत्यांकडून विरोध केला जात होता. मात्र या सर्व विरोधाला डावलून सुधाकर बडगुजर भाजपला साथ देण्यास तयार झाले आहेत. आज दुपारी मुंबई भाजपच्या प्रदेश कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. 

सुधाकर बडगुजर हे शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक येथील प्रमुख नेते होते. काही वादग्रस्त प्रकरणांमुळे ते गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आले आहेत. 2007 पासून बडगुजर यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर २००८ मध्ये बडगुजर यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. बडगुजर यांची शैली आक्रमक आहे. त्यामुळे पक्षाकडून त्यांच्यावर कमी काळात मोठी जबाबदार सोपवण्यात आली होती. २००९ ते २०१२ ही तीन वर्षे ते नाशिक महापालिकेचे सभागृहनेतेपदावर होते. त्यानंतर २०१२ ते २०१५ या काळात बडगुजर विरोधी पक्षनेतेपदी होते. २०१४ मध्ये पक्षाकडून त्यांना विधानसभेसाठी उमेदवारी देण्यात आली होती. नाशिक पश्चिम विधानसभेची उमेदवारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. मात्र यात त्यांचा पराभव झाला.  

कोण आहेत सुधारक बडगुजर, त्यांच्या भाजप प्रवेशाला का होतोय विरोध? (Sudhakar Badgujar kon aahet?)

BMC Election : राष्ट्रवादी आणि शिवसेनेत टाळीची चर्चा, पण काँग्रेसचं काय चाललंय? वाचा Inside Report

नक्की वाचा - BMC Election : राष्ट्रवादी आणि शिवसेनेत टाळीची चर्चा, पण काँग्रेसचं काय चाललंय? वाचा Inside Report

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत पार्टीत सामील...
सुधाकर बडगुजर हे सत्तीम कुत्तासोबत एका पार्टीत दिसल्यानंतर त्यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. २०२३ मध्ये एका पार्टीदरम्यान बडगुजर हे १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्तासोबत डान्स करतानाचा व्हिडिओ समोर आला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीका केली होती. 

सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांच्या मुलावरही मोक्काअंतर्गत कारवाई झाल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे सुधाकर बडगुजर वादात अडकले होते. 

महापालिका निवडणुकीतही विरोधी गटाकडून मारहाण...
महानगरपालिकेच्या एका निवडणुकीत नगरसेवक पळवापळवीवरुन बडगुजर यांना मारहाण झाली होती. त्याशिवाय २०१४ मध्येही लोकसभा निवडणुकीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासोबत अरेरावी केल्या प्रकरणात त्यांना न्यायालयाने सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा दिली होती. 

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com