
नवी मुंबई: मेलेल्या माणसाच्या टाळूवरील लोणी खाणं म्हणजे काय? याचीच प्रचिती देणारा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मृतदेहाला व्यवस्थित कपडा गुंडाळून देतो, 2000 रुपये द्या.. असं म्हणत मृतांच्या नातेवाईकांना लुबाडल्याचा संतापजनक प्रकार नवी मुंबई पालिकेच्या वाशी रुग्णालयात घडला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, एका 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना नवी मुंबईतील ऐरोली परिसरात घडली होती. या घटनेनंतर तिचा मृतदेह नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयात आणण्यात आला. तरुणीचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी तिचे नातेवाईक रुग्णालयात आले असता त्यांच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला.
तरुणीच्या मृतदेहाला कपडा व्यवस्थितत गुंडाळून देतो, 2000 रुपये द्या अशी मागणी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. मृतांच्या नातेवाईकांकडून दोनशे- पाचशे नव्हे तर थेट 2 हजार रुपये अवैधपणे घेतल्याच्या या प्रकाराने चांगलीच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, रुग्णालयामध्ये मृतांच्या नातेवाईकांची लुबाडणूक केली जाते हा प्रकार आजवर ऐकिवात होता. मात्र आता प्रत्यक्ष कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार कैद झाला आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आले असून पालिका प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world