
नागिंद मोरे, धुळे
वाहन भाडे तत्त्वावर घेऊन दरमहा भाड्याचे आमिष दाखवून शिरपूर व परिसरातील वाहनधारकांची तब्बल 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एका आरोपीस अटक करून 9 चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राहुल संतोष बावा यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्याकडील स्कॉर्पिओ व बोलेरो पिकअप ही वाहने आरोपी मुकेश अशोक लोहार याने भाडे तत्वावर घेतली होती. जानेवारी 2025 मध्ये सोनगीर टोल नाक्यानजीकच्या रस्ते बांधकामासाठी ही वाहने घेतली होती. दरमहा प्रत्येकी 26,000 भाड्याचे आश्वासन दिले होते.
(नक्की वाचा- Viral Video : महिलेची रिक्षाचालकाला चपलेने मारहाण, काही वेळात मागितली हात जोडून माफी)
सुरुवातीला एक महिन्याचे भाडे दिल्यानंतर, उर्वरित पैसे न देता वाहने देखील परत केली नाहीत. तपासादरम्यान समोर आले की, आरोपीने फक्त फिर्यादीचीच नव्हे तर आणखी सहा वाहनधारकांची स्कॉर्पिओ, स्विफ्ट, सियाझ, एक्सेंट, बोलेरो अशा 9 गाड्या भाड्याच्या बहाण्याने घेऊन त्यांची परस्पर विक्री व काही वाहनं गहाण ठेव आहे.
पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने आरोपीला शिरपूर येथील करवंद नाका येथे कारसह ताब्यात घेतले. त्यानंतर सखोल चौकशीत त्याने उर्वरित वाहने विविध ठिकाणी लपवल्याचे उघड झाले. पोलिसांनी तीन पथकांची स्थापना करून केलेल्या शोधमोहीमेमध्ये सर्व 9 वाहने जप्त केली आहेत.
(नक्की वाचा- Dhule News : जमिनीवर आपटलं नंतर जमिनीत पुरलं; आईसमोरच दीड वर्षांच्या चिमुकल्याला सावत्र बापाने संपवलं)
या वाहनांची एकूण अंदाजित किंमत 20 लाख 50 हजार इतकी आहे. शिरपूर पोलिसांनी दाखवलेल्या या कार्यक्षमतेमुळे वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. आणखी कोणी या टोळीच्या फसवणुकीचा बळी पडले असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world