जाहिरात

Dhule News: जात प्रमाणपत्रासाठी प्रांताधिकारी व नायब तहसीलदारांच्या नाने 30 हजारांची लाच, एकाला अटक

धुळे येथील तक्रारदारांच्या नात व नातूचे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्यांना अर्ज केला होता. मात्र जात प्रमाणपत्रासाठी प्रांताधिकारी, नायब तहसीलदार व कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या नावाने त्यांच्याकडे लाच मागण्यात आली होती.

Dhule News: जात प्रमाणपत्रासाठी प्रांताधिकारी व नायब तहसीलदारांच्या नाने 30 हजारांची लाच, एकाला अटक

नागिंद मोरे, धुळे

Dhule Crime News : जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रांताधिकारी व नायब तहसीलदारांसाठी 30 हजारांच्या लाचेची मागणी करणाऱ्या खाजगी एजंलला लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. नायब तहसीलदारांची कसून चौकशी करण्यात येत आहे. तर प्रांताधिकाऱ्यांची देखील चौकशी होणार आहे. तीन महिन्यातील एसीबीसी दुसरी कारवाई केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

धुळे येथील तक्रारदारांच्या नात व नातूचे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्यांना अर्ज केला होता. मात्र जात प्रमाणपत्रासाठी प्रांताधिकारी, नायब तहसीलदार व कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या नावाने त्यांच्याकडे लाच मागण्यात आली होती.  30 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या खाजगी एंजटला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने  रंगेहात पकडलं आहे. 

(नक्की वाचा-  Nashik News : आधी मुख्यमंत्र्यांची भेट, आता उघड नाराजी; सुधाकर बडगुजरांच्या मनात चाललंय काय?)

याप्रकरणी खाजगी एजंटविरोधात धुळे शहर पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या तीन महिन्यात प्रांत कार्यालयाशी संबंधित दुसऱ्यांदा एसीबीची कारवाई झाल्याने सरकारी कार्यालये चांगलेच चर्चेचा विषय ठरले आहे. 
            
वाल्मिक झाल्टे असं खाजगी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेल्या एजंटचं नाव आहे. त्याला ताब्यात घेताच त्याच्या मोबाईलच्या माध्यमातून मिळालेल्या महत्त्वाच्या बाबींसंदर्भात नायब तहसीलदार संजय शिंदे, यांच्यासह प्रांत कार्यालयातील दोन कर्मचारी व एका सेतू केंद्र चालकाला ताब्यात घेत कसून चौकशी करण्यात आली आहे. नायब तहसीलदार संजय शिंदे यांच्या चौकशीनंतर प्रांताधिकारी रोहन कुवर यांची देखील कसून चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

(नक्की वाचा-  Crime News : आंबे चोरीच्या संशयावरून शेतमजूराची बेदम मारहाण करत हत्या, 5 जणांना अटक)

धुळे प्रांत कार्यालय संबंधित गेल्या तीन महिन्यातील एसीबीती ही दुसरी कारवाई आहे. त्यामुळे प्रांत कार्यालयाच्या कारभारासंदर्भात संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे नवनियुक्त जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते या प्रकरणी काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com