
मनीष रक्षमवार, गडचिरोली
Gadchiroli News :
गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. हत्तीचा हल्ल्यात अनेकांचे प्राण सुद्धा गेलेले आहेत. अशाच एक प्रकरण पोर्ला येथील शेतकरी गजानन डोंगरवार यांच्या शेतात घडले. मात्र वारंवार तक्रार करुनही वन विभागाने याकडे दुर्लक्ष केले. अखेर शेतकरी गजानन डोंगरवार यांनी सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.
(NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नायक सिनेमात दाखवल्याप्रमाणे आशिष जैस्वाल यांनी शेतकऱ्यांना ऑन दी स्पॉट मदत केली. शेतकऱ्याच्या या निवेदनाची तात्काळ दखल घेत सहपालकमंत्र्यांनी वन विभागाला तात्काळ संबंधित अर्जावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, वन विभागाने डोंगरवार यांना नुकसान भरपाई मंजूर करत तासाभरातच मदतीचे आदेश जारी केले.
(नक्की वाचा - ATM Withdrawal : एटीएममधून पैसे काढणे महागले; 1 मे पासून नवा नियम लागू)
गजानन डोंगरवार यांनी याबाबत शासकीय विश्रामगृह येथे सहपालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. यावेळी जयस्वाल यांनी स्पष्टपणे सांगितले की, “वन विभागाने सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांप्रती अधिक संवेदनशील राहावे आणि त्यांना शासकीय मदत तत्काळ द्यावी.”
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world