जाहिरात

Dharashiv News: धाराशिवमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; बडा नेता अजित पवार गटाच्या वाटेवर?

Dharashiv Rahul Mote: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राहुल मोटे यांनी शरद पवार यांच्या गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याच गटाकडून त्यांनी निवडणूकही लढवली होती.

Dharashiv News: धाराशिवमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; बडा नेता अजित पवार गटाच्या वाटेवर?

ओंकार कुलकर्णी, धाराशिव

धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. परंडा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे हे लवकरच शरद पवार यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सामील होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या संभाव्य पक्षप्रवेशामुळे धाराशिव जिल्ह्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ वाढणार असून, शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसणार असल्याचे मानले जात आहे.

माजी आमदार राहुल मोटे यांनी आतापर्यंत पाच वेळा परंडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. त्यात सलग तीन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांचा मतदारसंघ आणि स्थानिक राजकारणावर चांगला प्रभाव आहे. भूम, परंडा आणि वाशी या तालुक्यांमध्ये त्यांचा मोठा मानणारा वर्ग आहे.

(नक्की वाचा-  Raj Thackeray vs Nishikant Dubey: मराठी vs हिंदी मुद्दा पेटला; भाजपचे निशिकांत दुबे पुन्हा बरळले, मनसेचा थेट इशारा)

कोण आहेत राहुल मोटे?

राहुल मोटे हे परंडा मतदारसंघाचे सलग तीन वेळा आमदार राहिले आहेत. त्यांनी आतापर्यंत परंडा विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा निवडणूक लढवली आहे. मागील 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे तानाजी सावंत यांच्याकडून त्यांचा अवघ्या 1,500 मतांच्या फरकाने निसटता पराभव झाला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राहुल मोटे यांनी शरद पवार यांच्या गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याच गटाकडून त्यांनी निवडणूकही लढवली होती. राहुल मोटे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जवळचे असल्याचेही बोलले जाते.

(नक्की वाचा-  'चीनने जमिनीवर कब्जा केला हे तुम्हाला कसं कळलं? देशभक्त असता तर...'; राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं)

राहुल मोटे यांच्या पक्षप्रवेशामुळे धाराशिवमधील राष्ट्रवादीच्या राजकारणाला नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा लवकरच मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com