जाहिरात

Gadchiroli News: लग्न आटोपून परतणाऱ्या कारला भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू

Gadchirol iAccident News: गडचिरोली-चामोर्शी मार्गावर लग्नाची वरात घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओचा आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी आहेत.

Gadchiroli News: लग्न आटोपून परतणाऱ्या कारला भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू

मनीष रक्षमवार, गडचिरोली

Gadchiroli News: लग्नसोहळा आटोपून आनंदाने घरी परतणाऱ्या वऱ्हाड्यांच्या गाडीला गडचिरोली-चामोर्शी मार्गावर भीषण अपघात झाला. स्कॉर्पिओ आणि ट्रॅव्हल्स यांच्यात झालेल्या या जोरदार धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 6 जण मृत्यूशी झुंज देत आहेत. ही घटना आज सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली.

अपघाताचा थरार

मिळालेल्या माहितीनुसार, कार रामपूर येथून लग्न सोहळा आटोपून भाडभीडी मोकासा येथे जात होती. या गाडीत क्षमतेपेक्षा जास्त म्हणजेच तब्बल 16 प्रवासी बसलेले होते. गडचिरोलीहून चामोर्शीकडे जाणाऱ्या प्रवासी ट्रॅव्हल्सला कुरुड-कढोली गावादरम्यान असलेल्या नाल्याजवळील वळणावर स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली.

(नक्की वाचा-  Ashok Kharat: 'भोंदू बाबा'वर मेहेरबान कोण? यादीत नाव नाही, तरीही खरातच्या मंदिराला निधी मंजूर! रेकॉर्डच गायब)

भीषण दृश्य आणि मदतकार्य

हा अपघात इतका भीषण होता की स्कॉर्पिओच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले. दुर्दैवाने, उपचारासाठी नेत असतानाच वाटेत दोघांचा मृत्यू झाला, तर तिघांचा जागीच मृत्यू झाला होता.

जखमींची प्रकृती चिंताजनक

सध्या जिल्हा रुग्णालयात 6 जखमींवर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. एका वळणावर ही धडक झाल्याने वेग मर्यादा किंवा ओव्हरटेकिंगचा प्रयत्न कारणीभूत ठरला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com