जालन्यात भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भाजपचे बडे नेते रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर यांच्यात मागील अनेक वर्षांपासून राजकीय वैर आहे. भाजपा जिल्हा कार्यकारणीची सदस्य नोंदणी अभियानात दोघांमधील वाद पुन्हा एकदा दिसून आला आहे.
जालना जिल्ह्यात आज माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा जिल्हा कार्यकारणीची सदस्य नोंदणी अभियानानिमित्त जिल्हा कार्यकाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व भाजप पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली.
(नक्काी वाचा- Shivsena MLA : शूटर्सना सुपारी दिली, तारीखही ठरली होती... शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट उघड?)
मात्र भाजपचे परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर आणि राहुल लोणीकर यांनी पाठ फिरवली. भाजप पक्षाच्या जालना जिल्हा कार्यकारणीवरून गेल्या अनेक वर्षापासून रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर यांच्यात वाद आहे. रावसाहेब दानवे यांची एक आणि बबनराव लोणीकर यांची एक अशा दोन भाजप कार्यकारणी जिल्ह्यात आहे. त्यामुळे जालना असा एकमेव जिल्हा आहे जिथे भाजपच्या दोन कार्यकारिणी आहेत.
विधानसभा निवडणुकीत जिंकल्यानंतर बबनराव लोणीकर यांनी सत्कार समारंभात दानवे यांचं नाव न घेता भोकरदनचा शनी, शकुनी मामा अशा शब्दात टीका केली होती. शनी मागे लागला होता, मी आताच शनीची पूजा करून आलोय. शकुनी मामाने मला पाडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप देखील लोणीकर यांनी सत्कार समारंभाच्या कार्यक्रमादरम्यान केला होता.
(नक्की वाचा- VIDEO : आजारी पत्नीची काळजी घेण्यासाठी घेतली स्वेच्छानिवृत्ती, मात्र निरोप समारंभातच पत्नीचा मृत्यू)
बबनराव लोणीकर यांना फडणवीस यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामागे देखील रावसाहेब दानवे यांचा हात असल्याची चर्चा आहे. लोणीकर आणि दानवे यांच्यातील दुरी आजच्या सदस्य नोंदणी अभियान कार्यशाळेतही दिसून आली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world