जाहिरात

Kaun Banega Crorepati 'साहेब मी शेतकरी!' म्हणत KBC गाजवलं, संभाजीनगरच्या कुंटेवारांनी 50 लाख कसे जिंकले? वाचा

Chhatrapati Sambhajinagar News : प्रतिकूल परिस्थिती आणि शेतीमधील संघर्ष यामुळे त्रस्त असलेल्या एका शेतकऱ्याने स्वत:च्या ज्ञानाच्या जोरावर एक मोठे स्वप्न सत्यात उतरवले आहे.

Kaun Banega Crorepati 'साहेब मी शेतकरी!' म्हणत KBC गाजवलं, संभाजीनगरच्या कुंटेवारांनी 50 लाख कसे जिंकले? वाचा
KBC Winner : संभाजीनगरच्या शेतकऱ्यानं केबीसीमध्ये 50 लाख रुपये जिंकले.

Chhatrapati Sambhajinagar News : प्रतिकूल परिस्थिती आणि शेतीमधील संघर्ष यामुळे त्रस्त असलेल्या एका शेतकऱ्याने स्वत:च्या ज्ञानाच्या जोरावर एक मोठे स्वप्न सत्यात उतरवले आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील पैठण तालुक्यात राहणारे कैलास कुंटेवार (Kailas Kuntewar) यांनी प्रसिद्ध टीव्ही शो ‘कौन बनेगा करोडपती' (KBC) मध्ये सहभाग घेऊन तब्बल 50,00,000 (पन्नास लाख रुपये) जिंकले आहेत.

शेतीत कष्ट आणि हॉटसीटवर यश

पैठण तालुक्यातील गावतांडा येथील रहिवासी असलेले कैलास कुंटेवार हे अगदी सामान्य कुटुंबातील शेतकरी आहेत. अवघ्या 2 एकर शेतीत त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. कोरडा आणि ओला दुष्काळ अशा दुहेरी संकटांशी ते सतत सामना करत होते. या कठीण परिस्थितीतही त्यांनी KBC मध्ये सहभागी होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी गेल्या 6 वर्षांपासून सातत्याने अभ्यास केला.

दिवसभर शेतीत राबराब राबल्यानंतर रात्री मोबाईलवर वेगवेगळ्या विषयांची माहिती वाचून त्यांनी आपले सामान्य ज्ञान (General Knowledge) वाढवले. याच ज्ञानाच्या जोरावर ते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासमोर KBC च्या हॉटसीटवर विराजमान झाले. त्यांनी मोठी रक्कम जिंकून आपल्या कुटुंबीयांना आनंद दिला आहे. 

( नक्की वाचा : KBC मध्ये 1 कोटी जिंकल्यावर खात्यात किती पैसे येतात? फार कमी लोकांना माहीत आहे उत्तर )

मुलांच्या शिक्षणासाठी वापरणार रक्कम

संपूर्ण आयुष्यभर काळ्या मातीत कष्ट करणाऱ्या कैलास कुंटेवार यांनी आजपर्यंत हातात कधी लाखभर रुपयेसुद्धा पाहिले नव्हते. आता जिंकलेली 50 लाख रुपयांची  (Fifty Lakh) रक्कम ते आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरणार आहेत.

कुटुंबीयांसाठी हा आनंद अत्यंत मोठा आहे. कैलास कुंटेवार यांच्या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात त्यांची चर्चा आहे. त्यांच्या पत्नी सुनीता, आई सुमन आणि वडील रामभाऊ यांनीही या यशानंतर आनंद व्यक्त केला.

KBC मध्ये कुंटेवार यांचा गेम

कैलास कुंटेवार यांनी त्यांच्या अभ्यासाच्या जोरावर खेळात उत्कृष्ट कामगिरी केली. फास्टेस्ट फिंगर फर्स्ट (Fastest Finger First) मध्ये जिंकल्यावर त्यांनी "गणपती बाप्पा मोरया" असा जयघोष केला. त्यांनी 11 व्या प्रश्नापर्यंत एकही लाइफलाईन (Lifeline) न वापरता अचूक उत्तरे दिली. 14 व्या प्रश्नापर्यंत त्यांनी सर्व लाइफलाईन वापरल्या.

कुंटेवाड यांना पाच लाखासाठी प्रश्न विचारण्यात आला....

कुठल्या पंतप्रधानांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय किसान दिन  साजरा केला जातो? चौधरी चरण सिंग, असं अचूक उत्तर देत कैलास यांनी पाच लाख जिंकले

साडे सात लाखांसाठीचा प्रश्न होता...

2025 पर्यंत असे शेवटचे उपराष्ट्रपती कोण, जे नंतर भारताचे राष्ट्रपती झाले ? या प्रश्नाचं के. आर. नारायणन असं उत्तर देत कुंटेवाड यांनी साडे सात लाख जिंकले

साडे बारा लाखांसाठीचा प्रश्न होता...

भगवान विष्णूच्या कुठल्या अवतारातल्या एका कार्यामुळे त्यांना त्रिविक्रम नावानं ओळखलं जातं ? प्रश्नाचं उत्तर होतं भगवान वामन

पुढचा प्रश्न पंचवीस लाखांसाठीचा...
1969 मध्ये रॅगनार फ्रिश आणि टिंबरगेन यांना कुठला पुरस्कार देण्यात आला? उत्तर होतं अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार

आणि पन्नास लाखांसाठीचा प्रश्न होता कुठल्या भारतीय क्रिकेटरनं वन डे करिअरमध्ये पहिल्याच बॉलमध्ये विकेट घेतली होती... ते नाव होतं... सदगोपन रमेश... कैलास यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं.... आणि तब्बल 50 लाख जिंकले


50 लाख जिंकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी कुंटेवार यांना 1 कोटीसाठी 15 वा प्रश्न विचारला. मात्र, या प्रश्नाच्या उत्तराबद्दल खात्री नसल्याने त्यांनी कोणताही धोका न पत्करता 50 लाख रुपये स्वीकारून खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. कैलास कुंटेवार यांनी KBC मध्ये मिळवलेले हे यश केवळ त्यांच्या बुद्धिमत्तेचा आणि कष्टाचा परिपाक आहे. शेतीतील संघर्षावर ज्ञानाच्या जोरावर मिळवलेला हा विजय अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com