
गुरुप्रसाद दळवी, सिंधुदुर्ग
कोल्हापूर येथील पर्यटक आंबोली जवळील गेळे गावातील कावळेसाद पॉईंट येथे 300 ते 400 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना शुक्रवारी घडली होती. आज या पर्यटकाचा मृतदेह बाहेर काढण्यास रेस्क्यू टीमला यश आलं आहे. राजेंद्र बाळासाहेब सनगर असं 45 वर्षीय मृत पर्यटकाचं नाव आहे. राजेंद्र हे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी होते.
(नक्की वाचा- Toll Comparison: रस्तेप्रवास होईल स्वस्त! कमी टोल लागले असा रस्ता दाखवेल हे अॅप)
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथील राजेंद्र सनगर हे कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या 14 सहकाऱ्यांच्या टीमसोबत आंबोली येथे वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आले होते. शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास कावळेसाद पॉईंट येथे रेलिंग जवळून असताना पाय घसरला आणि ते दरीत कोसळले. आंबोली रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. मात्र दाट धुके असल्यामुळे त्यांचा शोध घेण्यास काल अपयश आले होते. त्यामुळे काल सायंकाळी ही मोहीम थांबण्यात आली होती.
शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. यावेळी एनडीआरएफचे पथक सांगेली व आंबोली रेस्क्यू टीम आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी मोठ्या दोऱ्यांच्या सहाय्याने दरीत झुला सोडून राजेंद्र यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
(नक्की वाचा- संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरचा 'हिबानामा' गोत्यात; जावेदने ₹11 कोटी मुद्रांक शुल्क भरले?)
राजेंद्र सनगर यांचा मृतदेह 150 ते 200 फुटांवर आढळून आला. डोक्याच्या बाजूने थेट दरीत कोसळल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी राजेंद्र याच्या नातेवाइकांसह मित्रपरिवार आणि पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world