
मुंबई: भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश संघटनेत एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. राज्यभरात एकूण 1221 मंडळ स्थापन करण्यात आले आहेत. त्यापैकी 963 मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रभावी पद्धतीनं पूर्ण झाली आहे. “संघटन हेच खरे बळ” या तत्त्वावर चालत, भाजपनं आता महाराष्ट्रात मजबूत गड उभारण्याची तयारी सुरू केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भाजपच्या संघटनात्मक बांधणीचा हा टप्पा महाराष्ट्राच्या सर्व भागांतील राजकीय ताकद दृढ करण्याच्या दृष्टीनं निर्णायक ठरतोय. संपूर्ण राज्यभर 1221 मंडळ गठीत करण्यात आले आहेत, त्यापैकी 963 मंडळांची रचना जाहीर करण्यात आली असून, यातील 258 मंडळे नव्यानं स्थापन केली गेली आहेत.
प्रमुख विभागवार पाहता:
• कोकण-ठाणे विभागात 184 मंडळ
• उत्तर महाराष्ट्रात 184 मंडळ
• पश्चिम महाराष्ट्रात 222 मंडळ
• विदर्भात 313 मंडळ
• मराठवाड्यात 207 मंडळ
• मुंबई विभागात 111मंडळ
Unauthorized Schools: अंबरनाथ तालुक्यात 6 अनधिकृत शाळा! शिक्षणाधिकाऱ्यांनी जाहीर केली यादी, वाचा...
मंडळ गठीत करण्यात आले आहेत. या संपूर्ण नियुक्त्या केवळ आकडेवारी नाही, तर पक्षाची जनाधारावर आधारित शक्ती वाढवण्याचा प्रयत्न आहे. यातून भाजपच्या कार्यपद्धतीतील शिस्त, संघटन आणि वेळेचं भान प्रकर्षानं अधोरेखित होतं.
भाजपचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एका संघटित आणि समर्पित कार्यपद्धतीची ही सुरुवात आहे. भाजपची रणनीती आता अधिक गावखेड्यांपर्यंत पोहोचवण्याचा आणि सर्वसामान्य मतदाराशी थेट संवाद साधण्याचा ध्यास घेतेय.
( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi : आयपीएलचा इतिहास बदलला, 14 वर्षाच्या मुलानं केलं पदार्पण, पहिल्याच मॅचमध्ये खणखणीत सुरुवात )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world