दहावी आणि बारावीच्या (SSC and HSC) विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी - मार्च 2025 मध्ये घेण्यात येणार आहेत. अखेर या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या परीक्षांचे वेळापत्रक www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
नक्की वाचा - सरन्यायाधीशांना सापडेना हरवलेलं घर, नवे CJI संजीव खन्नांची हृदयस्पर्शी स्टोरी, एकदा वाचाच
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (सर्वसाधारण, द्विलक्षी व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाइन परीक्षा) मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी ते मंगळवार दिनांक 18 मार्च 2025 या कालावधीमध्ये घेण्यात येतील. तर, प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा शुक्रवार दिनांक 24 जानेवारी ते सोमवार दिनांक 10 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये घेण्यात येतील.
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावीची परीक्षा शुक्रवार दिनांक २१ फेब्रुवारी ते सोमवार दिनांक 17 मार्च 2025 या कालावधीमध्ये घेण्यात येतील. तर, प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा सोमवार दिनांक ३ फेब्रुवारी ते गुरुवार दिनांक 20 फेब्रुवारी 2025 या कालावधीत घेण्यात येणार आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/ उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात अंतिम वेळापत्रक देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी त्या वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी. अन्य कोणत्याही माध्यमातून प्रसारित झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये, असेही राज्य मंडळामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world