जाहिरात

Cancer: कॅन्सर रुग्णांसाठी संजीवनी! राज्यात 18 ठिकाणी सरकारी खर्चात उपचार; वाचा, कोणकोणत्या सुविधा मिळणार?

Cancer treatment: राज्यातील कॅन्सर रुग्णांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार आता सरकारी रुग्णालयांत मिळणार आहेत.

Cancer: कॅन्सर रुग्णांसाठी संजीवनी! राज्यात 18 ठिकाणी सरकारी खर्चात उपचार; वाचा, कोणकोणत्या सुविधा मिळणार?
Maharashtra Cancer Care: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा निर्णय घेतलाय.
मुंबई:

Maharashtra Cancer Care: राज्यातील कॅन्सर रुग्णांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार आता सरकारी रुग्णालयांत मिळणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 'महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन' (MAHACARE Foundation) या कंपनीच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. या फाऊंडेशनमार्फत राज्यभरात 18 रुग्णालयांचे त्रिस्तरीय (L1, L2, L3) जाळे उभारले जाणार आहे.

कोणते उपचार होणार?

 रेडिओथेरपी, किमोथेरपी, सर्व प्रकारच्या कॅन्सरचे निदान, शस्त्रक्रिया, भौतिकोपचार (Physiotherapy), मानसिक आधार व उपचार, तसेच पॅलेटिव्ह केअर (Palliative Care), औषध सुविधा आणि संशोधन या केंद्रावर होणीर आहे. 

पदव्युत्तर व अतिविशेषोपचार शिक्षण (Post-Graduate and Super-Specialty Education) देखील इथं उपलब्ध असेल.आजार टाळण्यासाठी जीवनशैलीतील बदलांबाबत जनजागृतीचे उपक्रम राबविले जातील.

( नक्की वाचा : Government Jobs 2025: राज्य शासनाच्या 'या' विभागात 903 पदांवर मोठी भरती; नोकरीसाठी कोण पात्र? वाचा सविस्तर )
 

कोणत्या केंद्रावर होणार उपचार?

या धोरणानुसार, राज्यातील 18 रुग्णालयांची रचना खालीलप्रमाणे करण्यात आली आहे:

L1 स्तर (शिखर संस्था):

टाटा स्मारक रुग्णालय ही संस्था L1 स्तरावरील शिखर संस्था (Apex Body) म्हणून निश्चित करण्यात आली आहे.

L2 स्तर (एकूण 8 केंद्रे):

छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, नागपूर, सर ज. जी. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जे. जे.) मुंबई, छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापूर आणि बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथील 6 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्नित रुग्णालये.

नाशिक आणि अमरावती येथील सार्वजनिक आरोग्य विभागाची 2 संदर्भ सेवा रुग्णालये.

L3 स्तर (एकूण 9 केंद्रे):

अंबाजोगाई (बीड), नांदेड, यवतमाळ, मुंबई (कामा व आल्ब्लेस रुग्णालय), सातारा, बारामती, जळगाव, आणि रत्नागिरी येथील 8 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्नित रुग्णालये.

शिर्डी संस्थानचे रुग्णालय.

यापैकी L2 स्तरावरील 8 केंद्रांमध्ये कॅन्सरसंबंधी पदव्युत्तर व अतिविशेषोपचार शिक्षण म्हणजेच MD, MAS, DM-MCh आणि DNB साठी फेलोशिप उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अर्थव्यवस्था आणि व्यवस्थापन

फाऊंडेशनला सुरुवातीला 100 कोटी रुपयांचे भागभांडवल आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या शुल्काचा 20% हिस्सा मिळणार आहे. L2 केंद्रांसाठी 1,529 कोटी 38 लाख आणि L3 केंद्रांसाठी 147 कोटी 70 लाख रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली आहे. या वाढत्या रुग्णसंख्येवर (ICMR अहवालानुसार 2025 पर्यंत 11% वाढ अपेक्षित) नियंत्रण मिळवण्यासाठी हे धोरण महत्त्वाचे ठरणार आहे. L3 केंद्रांवर मनुष्यबळ व व्यवस्थापन सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर केले जाईल.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com